महाराष्ट्र
पी एम किसान सन्माननिधी व नमो शेतकरी महा सन्माननिधीचा लाभ घेण्याचे आवाहन.

उपसंपादक——– हुसेन मुलाणी टाइम्स 9. मराठी न्यूज नेटवर्क मो;– 97 30 867 448
ई केवायसी , आधार सिडीग व लॅन्ड रेकॉर्ड आद्यवत करा व पी एम किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान निधीचा लाभ घ्या असे आवाहन -प्र तालुका कृषी अधिकारी सतीश कचरे माळशिरस यांनी केले आहे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवात बळीराजाच्या उत्पन्न वाढीसाठी केंद्र शासन पी एम किसान सन्मान निधीबरोबर राज्य शासनाचा पीएम सन्मान निधीस पात्र असलेल्या लाभार्थीना नमो शेतकरी महासन्मान निधी १५ जून २०२३ च्या शासन निर्णयाप्रमाणे देण्यास मान्यता देण्यात आली आहे. पीएम किसान सन्मान निधीचा १४ व्या २००० रु हप्त्याबरोबर राज्य शासनाचा नमो शेतकरी महासन्मान निधीचा २००० रू चा पहिला हप्ता एप्रिल ते जुलै साठी कृषि विभागामार्फत दिला जाणार आहे जमा होणार आहे. त्यासाठी पात्र लाभार्थीनी खालील कार्यप्रणालीचा वापर करावा . १ पीएम किसान संकेत स्थळी जाऊन ईकेवायसी टॅब ओपन करावा व त्यामध्ये स्वतःचा आधार नंबर व मोबाईल नंबर भरून ओटीपी प्राप्त करून समीट करावा व आधार सलग्न मोबाईल नं भरून ६ अंकी पीन समीट करून ईकेवायसी करून घ्यावी . २ - बॅक खातेस मोबाईल नंबर व आधार नंबर सलग्न करणेसाठी खाते असलेल्या बॅकेत जाऊन फॉर्म भरून सलग्न करून घ्यावे ३- पात्र लाभार्थीनी मोबाईल नंबर आधारशी सलग्न नसेल तर सीएससी सेटर , आधार सुविधा केंद्र, किंवा पोस्टात जाऊन खाते सह मोबाईल नंबर व आधार सलग्न करून ईकेवायसी करावी . ४- आधार नंबर , बॅक खाते व मोबाईल नंबर तत्काळ सलग्न करणेसाठी पात्र लामार्थीनी किंवा नवीन अर्ज भरणाऱ्या शेतकरी बंधूनी पोस्ट बॅक खाते उघडून घ्यावे . ५ - लॅन्ड रेकॉर्ड अद्यावत करणेसाठी महसूल विभाग तलाठी, सर्कल , तहसिलदार यांचेकडे पुराव्यासह लॅन्ड रेकॉर्ड अद्यावत करावे . ६ - मृत खातेदार चे वारसांनी आधार , मोबाईल नंबर सह पोस्ट बॅक खाते सह लॅन्ड रेकॉर्ड सह नवीन प्रस्ताव दाखल करावा . ७- आधार नंबर कुठल्या मोबाईल नंबरला सलग्न आहे हे महितीसाठीhttps://udyamregistration.gov.in या संकेत स्थळावर जाऊन आधार नंबर भरून सलग्न मोबाईल नंबरची शेवटची ४ अंक माहीत करून घ्यावीत . ८- आधारला नंबरला मोबाईल नंबर सलग्न करणेसाठी स्वतःचे नावावर नोंदणी मोबाईल नंबर फोन मध्ये madhar app अॅप डाऊनलोड करून आधार नंबरला स्वतः चे नावे असलेला मोबाईल नंबर सलग्न करून घ्यावा . खरिप हंगामाच्या उबरट्यावर बियाणे, खते, निविष्ठा व मशागत साठी पीएम किसान सन्मान निधीचा २००० रु हाप्ता व नमो शेतकरी महासन्मान निधी २००० रु हाप्ता प्राप्त करून घेणेसाठी स्वतः व कृषि विभाग ग्रामपातळीवरील अधिकारी कर्मचारी व दिनाक २० ते २१ जून मोहीमीत सहभागी ' सहकार्य करून ईकेवायसी व आधार सिडीग करण्याचे अहवान तालुका कृषि अधिकारी कार्यालयाने केले आहे.



