महाराष्ट्र

शिवरत्न शिक्षण संस्थेत देशभक्तांची ओळख व शाळा तेथे क्रांती मंदिर अभियान संपन्न

उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. . 97 30 867 448

कर्नाळा चॅरिटेबल , ट्रस्टचे देशभक्तकोशकार चंद्रकांत शहासने यांच्या संग्रहात असलेल्या २००० क्रांतिकारकांचे छायाचित्र, १०,३११ हुतात्म्यांची महिनावर नोंद .१०,००० क्रांतिकारकांची माहिती देणारा असा देशभक्तकोश या साहित्याचा दुर्मीळ असा डिजीटल डेटा शांततेचा नोबेल पुरस्कार नामांकन प्राप्त श्रीमती स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील .रणजितसिंह मोहिते-पाटील या मान्यवरांच्या हस्ते शिवरत्न शिक्षण संस्थेकडे सुपुर्द करण्यात आला.

शिवरत्न शिक्षण संस्था हा डीजीटल डेटा माळशिरस तालुक्यातील विविध शाळांकडे सुपूर्त करणार आहे. ज्यायोगे शाळांमध्ये ओळख देशभक्तांची, शाळा तेथे क्रांतीमंदीर हे अभियान पोहोचेल व भारतीय क्रांतिवीरांच्या बलिदानाचा,राष्ट्र कार्याचा इतिहास विद्यार्थ्यांना अधिक ज्ञात होईल.

कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त देशभक्तकोशकार श्री.चंद्रकांत शहासने यांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या करीता “ओळख देशभक्तांची व शाळा तेथे क्रांतीमंदीर” या चालवलेल्या अभियानाद्वारे विद्यार्थी-विद्यार्थिनी करीता क्रांतिकारकांची दुर्मीळ माहीती उपलब्ध करून देणे म्हणजे एका प्रकारचे राष्ट्रकार्यच आहे. अशी प्रतिक्रिया शिवरत्न शिक्षण संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष .धैर्यशिल मोहिते-पाटील यांनी कार्यक्रमा प्रसंगी व्यक्त केली.

सदर कार्यक्रमास श्री चंद्रकांत शहासनेसंस्थेचे संचालक श्रीकांत राऊत ,दिलीप चित्रे महाराज,
प्रिन्सीपल अल्बर्ट थरकन, बिनो के पाऊलस , विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

जनसंपर्क विभाग
शिवरत्न शिक्षण संस्था

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button