पालघर जिल्ह्यात 122 शाळा अनधिकृत…पालकांना शिक्षण विभागामार्फत या शाळांमध्ये पाल्याचा प्रवेश न घेण्याचे आवाहन

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640. पालघर जिल्हा वृत्तांत
पालघर जिल्ह्यातील 84 प्राथमिक आणि 38 माध्यमिक अशा एकूण 122 शाळा अनधिकृत पणे असल्याचे शिक्षण विभागाकडून घोषित करण्यात आले आहे.
या अनधिकृत शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश घेऊ नये असे आवाहन देखील पालघर जिल्हा परिषद आणि प्रशासनाने करून या शाळांवर गुन्हे दाखल करण्यासाठी पोलीस तक्रारी देखील केल्या आहेत.
पालघर जिल्हा परिषदेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार पालघर जिल्हा प्राथमिक विभागाच्या 84 शाळा अनधिकृत आहेत यापैकी पालघर तालुक्यातील 7, वाडा तालुका 5 आणि वसई तालुक्यातील सर्वाधिक 71 शाळांचा समावेश आहे.तर माध्यमिक विभागाच्या 38 शाळा पैकी वसई तालुक्यातील 36 शाळा व विक्रमगड जव्हार येथील 1 शाळा अनधिकृत आहे.या अनधिकृत शाळांवर जिल्हा परिषद व शिक्षण विभागामार्फत कारवाई करण्यात आली आहे.
ज्या शाळा नोटीस देऊन देखील बंद करण्यात आल्या नाहीत त्या शाळांना एक लाख रुपये दंड आणि शाळा बंदची नोटीस दिल्यापासून शाळा बंद न केलेल्या शाळांना प्रत्येकी दिवस दहा हजार रुपये दंड आकारून कारवाई करण्यात येणार आहे. या सर्व शाळांमध्ये प्राथमिक विभागाच्या 84 तर माध्यमिक विभागाचा 38 शाळांचा समावेश आहे.यापैकी अनेक अनधिकृत शाळा व्यवस्थापक शाळा बंद करण्याचा मार्गावर आहेत.
कारण या शाळेसह शाळा व्यवस्थापकावर पोलीस कारवाई करून गुन्हे दाखल करण्याची मागणी शिक्षण विभागाकडून करण्यात आली आहे. म्हणून अशा अनधिकृत शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्याना प्रवेश देऊ नये असे आवाहन पालघर जिल्हा परिषद मुख्य अधिकारी भानुदास पालवे, शिक्षण समिती सभापती पंकज कोरे आणि शिक्षण विभाग यांच्याकडून करण्यात आले आहे



