सफाळे वासियांचे जन आक्रोश आंदोलन… राजकीय पुढारी आणि नेत्यांचा पुढाकार… तरी देखील सफाळे रेल्वे फाटक बंद…. रेल्वे प्रशासनाचा निर्णय

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
पश्चिम रेल्वेचे सफाळे रेल्वे फाटक बंद प्रश्न सुटता सुटेना सामान्य नागरिकांचा विरोध सफाळे विकास कृती समिती आणि सफाळे व्यापारी असोसिएशनचे जन आक्रोश आंदोलन स्थानिक राजकीय पुढारी आणि खासदार डॉ.हेमंत सवरा यांच्या पुढाकार तरी देखील गेल्या आठ दिवसांपासून रेल्वे फाटक बंद आणि पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यास रेल्वे प्रशासन असमर्थ यामुळे सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील समस्या प्रवासी वर्गांना होणारी अडचण शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, भाजी विक्रेते व वाहतूकदार या रेल्वे प्रशासनाच्या अविचारी कारभाराला अक्षरशा वैतागले आहेत.

यामुळे या रेल्वे प्रशासनाच्या अविचारी कारभाराविरुद्ध सफाळे विकास कृती समिती व सफाळे व्यापारी असोसिएशन यांच्या पुढाकाराने येत्या आठ दिवसात पुन्हा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा पालघर जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखर आणि रेल्वे प्रशासन यांना 4 एप्रिल रोजी पत्रक देऊन करण्यात आला आहे.
मात्र यावर रेल्वे प्रशासन तोडगा काढण्यास समर्थ ठरले असून मालवाहू आणि जलद गाड्या यांचा मार्ग मोकळ्या करण्यासाठी व या गाड्यांना सिग्नल यंत्रणा नसल्यामुळे सफाळे रेल्वे फाटकात रेल्वे अपघात होऊन जीवित हानी होऊ शकते या कारणास्तव सफाळे रेल्वे फाटक कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहे असे रेल्वे प्रशासनाकडून ठाम रोखठोक उत्तर 4 एप्रिल 2025 रोजी जन आक्रोश आंदोलन कर्त्यांना व या आंदोलनाला भेट देणाऱ्या पालघर उपजिल्हाधिकारी महेश सागर यांना देण्यात आले आहे.
सामान्य जनतेसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्या अन्यथा रेल्वे फाटक खुला करून द्या या मागण्यासाठी शुक्रवार दिनांक 4 एप्रिल 2025 रोजी सफाळे वासियांनी सफाळे विकास कृती समिती आणि सफाळे व्यापारी असोशियन यांच्या नेतृत्वाखाली जन आक्रोश आंदोलन पुकारले होते.

या आंदोलनातील आंदोलनकर्त्यांच्या मागण्या रेल्वे प्रशासनाने अमान्य केल्यामुळे यापुढे रेल्वे क्रॉस करताना जीवित हानी झाल्यास रेल्वे प्रशासन जबाबदार राहील असा इशारा या आंदोलनादरम्यान सफाळे विकास कृती समिती आणि सफाळे व्यापारी असोसिएशन यांच्याकडून रेल्वे प्रशासनाला देऊन येत्या काही दिवसात रेल्वे प्रशासनाने पर्यायी मार्ग उपलब्ध करून नदिल्यास तीव्र उग्र असे आंदोलन करण्यात येईल असा सक्त इशारा रेल्वे प्रशासनाला देण्यात आला आहे.



