महाराष्ट्र

अकलूज येथे माजी मंत्री “आदित्य ठाकरे “यांच्या वाढ दिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी संपन्न.

उपसंपादक ——–हुसेन मुलाणी टाइम्स 9. मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448

महाराष्ट्राचे माजी मंत्रीमंडळ” आदित्य ठाकरे “यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार दिनांक 15 जून 2023 रोजी अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये अकलूज शहर शिवसेनाच( उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे) यांच्यावतीने नेत्र तपासणी शिबिर संपन्न झाली
सदर शिबिराची सुरुवात शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांचे शासकीय अंगरक्षक गणेश महाकर यांच्या मातोश्रींच्या नेत्र तपासणी करून करण्यात आली,

त्याला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या शिबिरात एकुण 105 जणांनी नेत्र तपासणी करण्यात आली त्यांना, चष्म्याचा नंबर लागला आहे अशा रुग्नांना अतिशय अल्प किंमत मध्ये चष्मे उपलब्ध करून देण्यात आले,29 नागरिकांना मोतीबिंदू झाल्यामुळे त्यांचे मोतीबिंदू ची शस्त्रक्रिया करायला सांगीतले,या सर्वांचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया पुण्यातील नामांकित हॉस्पीटल बुधरानी हॉस्पीटल येथे करण्यात येणार असून शस्त्रक्रिये साठी होणारा सर्व खर्च समाजसेविका राणी रामलाल बनपट्टे यांच्या खर्चाने करण्यात येणार आहे,शिवसेनेच्या ब्रिद वाक्यानुसार 80%समाजकारण 20%राजकारण यानुसारच शिवसेना समाजात जनमानसाची सेवा करत राहणार आहे

सदर शिबिर शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिव आरोग्य सेनेच्या अध्यक्षा डाॅ.शुभाताई राऊळ, कार्याध्यक्ष डाॅ. किशोरजी ठाणेकर यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र राज्य समन्वयक .जितेंद्र दगडू(दादा) सकपाळ,डाॅ.आजीत पाटील सचिव. तसेच पश्चिम महाराष्ट्र डॉक्टर सेलचे अध्यक्ष डाॅ.उध्दवजी इंगोले यांच्या मार्गदर्शनाने सोलापुर जिल्हा.समन्वयक दिपक सुर्वे याच्या मदतीने राबविण्यात आले

याप्रसंगी तालुका प्रमुख संतोष(भैय्या) राऊत,तालुका उपप्रमुख महादेव बंडगर,अकलुज शहर प्रमुख अनिल बनपट्टे, युवासेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे, माळीनगर शहर प्रमुख अरुण मदने, माजी अकलुज शहरप्रमुख अजित गांधी, जेष्ठ शिवसैनिक पी.व्हि.कुलकर्णी, ग्राहक संरक्षण कक्ष तालुका प्रमुख उमेश जाधव,वकील संघटना अध्यक्ष बी.आर.पाटील, सोशल मीडिया प्रसिद्धी प्रमुख अवधुत कुलकर्णी, संजय गुंड,नाना पराडे,रज्जाक मुलाणी,मिलींद मोरे, संतोष कदम व बहुसंख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button