सामाजिक

*आमदार संजय मामा शिंदे हे मुंबई पाठोपाठ आता जम्मू-काश्मीरमध्ये आमदार आपल्या दारी कार्यक्रम राबवतील,,,,,, पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांचा आमदार शिंदे गटाला मार्मिक टोला

करमाळा प्रतिनिधी

आमदार संजय मामा शिंदे हे मुंबई पाठोपाठ जम्मू काश्मीर मध्ये आमदार आपल्या दारी हा कार्यक्रम राबवतील असा मार्मिक टोला पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी लगावला. काल मुंबई येथे करमाळा मतदार संघाचे आमदार संजय मामा शिंदे यांनी आमदार आपल्या दरी हा उपक्रम राबवला. करमाळा तालुक्यातील परंतु नवी मुंबई येथे वास्तव्यास असणारी मंडळी या कार्यक्रमास उपस्थित होती. यावर प्रतिक्रया देताना पाटील गटाकडून सांगण्यात आले की करमाळा तालुक्यातील शेतकरी, धरणग्रस्त, पेन्शनर, विविध शासकीय विभाग हे आमदार संजय मामा शिंदे यांच्या प्रतीक्षेत आहेत. विद्यमान आमदार महोदय हे महिन्यातून एकदा करमाळा तालुक्यातील येतात. आणि जर आलेच तर बोटिंग सारखे शौक पूर्ण करण्यात त्यांचा वेळ जातो. सामान्य माणसांच्या प्रश्नासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. एकीकडे उजनी धरण रिकामे होत चालले आहे. रस्त्याचे प्रश्न तालुक्यातील दळण वळण व्यवस्था उद्ध्वस्त करून बसले आहेत. तालुक्यातील महत्वाचे पणीसाठे रिकामे पडलेत, वडी वस्तीवर पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जेऊर सह २९ गावे या पाणी पुरवठा योजनेस कोर्टी बोरगाव या प्राधिकरण योजना बंद आहेत. कित्येक गावातून नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी शासनाकडे टँकरची मागणी होऊ लागली आहे. याबाबत प्रशासकीय आढावा बैठक घेतली जात नाही तरी किंबहुना या बैठकीसाठी उपस्थित राहण्यास आमदार महोदयांना वेळ नाही. घोटी पासून ते तरटगाव पर्यंत नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाऱ्याची संभाव्य टंचाई जाणवत असताना आमदार महोदय यांनी करमाळा तालुक्यात आमदार आपल्या वाडी वस्तीवर हा उपक्रम राबवावा आणि तालुक्यातील मूळ प्रश्न सोडवावेत अन्यथा तालुक्यातील विविध भागातून नागरिक आंदोलन करत रस्त्यावर उतरतील असा इशाराही यावेळी देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button