शहर

पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या जनसंपर्क जनजागृती अभियानाचा चोरावर प्रभाव अज्ञात चोराने सोने केले परत

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक 7030516640 पालघर जिल्हा वृत्तांत.

पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, आणि अप्पर पोलीस अधीक्षक पंकज शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर जिल्ह्यात जनसंपर्क अभियान जनजागृती मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेचा जनसामान्य नागरिकांवर प्रतिकूल प्रभाव झाल्याचे उत्तम उदाहरण म्हणजे केळवा सागरी पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांच्या पोलीस ठाणे हद्दीतील श्रीमती प्रतीक्षा( विमल) ठकसेन तांडेल मूळच्या राहणाऱ्या केळवा मांगेला आळी परंतु कामानिमित्त त्या मुंबई येथे राहतात त्या दिनांक 30 मे 2023 रोजी केळवा येथील आपल्या नातेवाईकांच्या लग्नासाठी आल्या होत्या

31 मे 2023 रोजी त्या जेवण झाल्यानंतर आपल्या घरातून फेरफटका मारण्यासाठी गेल्या असताना अज्ञात इसमानी त्यांच्या घरातील 14 तोळे सोने चोरी केले होते याबाबत त्यांनी केळवा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या चोरीचा तपास करताना प्रथम केळवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड आणि पोलीस कॉन्स्टेबल जयदीप सांबरे यांच्या पथकाने केळवा मांगेला आळी येथे गावकऱ्यांची मीटिंग घेऊन चोरीचे महत्व पटून दिल्यावर सोने चोरी केलेल्या अज्ञात चोरांनी हे सोने श्रीमती प्रतीक्षा ठकसेन यांच्या घराजवळ राहणाऱ्या त्यांच्या आईच्या अंगणात आणून ठेवून त्या सोन्यासह एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button