महाराष्ट्र

पालघर जिल्ह्यातील केळवा सागरी पोलीस ठाणे इन्चार्ज पदी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके यांची नियुक्ती

पालघर जिल्हा प्रतिनिधी

विजय घरत

भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640

पालघर जिल्ह्यातील केळवा सागरी पोलीस ठाणे इन्चार्ज पदी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता कठाळराव शेळके यांची नव्याने गुरुवार दिनांक 18 जानेवारी 2024 पासून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी गुरुवार दिनांक 18 जानेवारी रोजी संध्याकाळी केळवा सागरी पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे. ही नियुक्ती पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी वरिष्ठांच्या आदेशान्वये केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके यांनी महाराष्ट्र पोलीस खात्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून प्रथम 2013 ते 2017 मध्ये गडचिरोली येथे तर 2017 ते 2020 मध्ये औरंगाबाद येथे क्राईम ब्रँच मध्ये पोलीस उपनिरीक्षक असताना दमदार कामगिरी बजावली आहे. यानंतर 2020 ते जून 2023 मध्ये त्यांची नियुक्ती ग्रामीण पोलीस रत्नागिरी येथील वाहतूक शाखेवर करण्यात आली होती. यानंतर जुलै 2023 ते 15 जानेवारी 2024 पर्यंत ते पालघर जिल्ह्यातील तलासरी पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत होते. केळवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली असून सहायक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांची बदली 18 जानेवारी 2024 पासून पालघर सायबर येथे करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button