महाराष्ट्र

अकलुज(जयशंकर -उद्यान) येथे छञपती शिवाजी महाराज यांच्या 393 व्या जयंती निमित्त प्रतिमापुजन आणि व्याख्यानाचे आयोजन

उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448

मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, अकलूज नगरपरिषद व सर्व शिवप्रेमी यांचे संयुक्त विद्यमाने कुळवाडीभूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांची 393 वी जयंती निमित्त शनिवार दिनांक 18 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी सात वाजता जय शंकर उद्यान अकलूज येथे भव्य दीपोत्सव करण्यात येणार आहे तरी जिजाऊ ब्रिगेडच्या सर्व महिला तसेच शिवप्रेमी महिला भगिनींनी पण त्या घेऊन उपस्थित राहावे असे आवाहन जिजाऊ ब्रिगेडचे अध्यक्ष मनोरा मला आवडते यांनी केले आहे तसेच रविवार दि.19 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 9 वा. जयशंकर उद्यान येथे प्रतिमापूजन व पुतळापूजन करून त्यानंतर 9/30 वा औरंगाबाद येथील मराठा सेवा संघाच्या ॲड .वैशाली डोळस, यांचे व्याख्यान होणार आसुन या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणुन माजी उपमुख्यमंत्री- विजयसिंह मोहिते पाटील, आमदार -रणजितसिंह मोहिते पाटील शिवामृत दूध उत्पादक संघाचे चेअरमन- धैर्यशील मोहिते पाटील ,जि. प. माजी सदस्य शितलदेवी मोहिते पाटील, प्रताप क्रीडा मंडळाचे अध्यक्ष – स्वरूपाराणी मोहिते पाटील माजी सरपंच- शिवतेजसिंह मोहिते पाटील ,किशोरसिंह माने पाटील, माजी उपसरपंच- धनंजय देशमुख ,उत्तमराव माने शेंडगे, अक्काताई माने शेंडगे, प्रिया नागणे ,विनायक गुळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी- डॉ .बसवराज शिवपुजे ,अकलूज नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे ,अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक -अरुण सुगावकर आणि रवींद्र पवार आदी मान्यवर उपस्थित राहणार असून या पंचक्रोशीतील शिवप्रेमीनी बहु संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button