महाराष्ट्र

नाशिक येथील महाराष्ट्र राज्य गोल्डन ग्रुप (सामाजिक संघटने )चे कार्य उल्लेखनीय आणि कौतुकास्पद

टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

नाशिक येथील गोल्डन ग्रुप महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेचे कार्य उल्लेखनीय आणि कौतुकास्पद असून या ग्रुपच्या माध्यमातून मुंबई येथे बाहेरून आलेल्या गोरगरीब रुग्णांना कोणताही आजार असेल, कोणतेही टेस्ट असेल ,किंवा ऑपरेशन असेल ,अथवा ब्लड ची आवश्यकता असेल, तसेच त्या रुग्णांची आणि नातेवाईकांची जेवण्याची व राहण्याची सोय गोल्डन ग्रुप सामाजिक संघटनेच्या वतीने निशुल्क आणि मोफत केली जाते .

उदरनिर्वाह करिता बाहेरून आलेल्या मुलांना रोजगार निर्मिती करून त्या बेरोजगार मुलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाते तसेच रुग्णाची आर्थिक परिस्थिती हालाखीची असेल तर या ट्रस्टमार्फत हॉस्पिटल ,मेडिकल चे पूर्णपणे बिल कमी करण्याचे काम करत आहे .अभ्यासात हुशार आणि कर्तुत्ववान मुले असतील आणि त्यांची शिक्षण घेण्याची आर्थिक परिस्थिती नसेल तर त्या मुलांना शाळेचे गणवेश व इतर साहित्य मोफत देण्यात येते ..

एखादा मनोरुग्ण असेल तर त्यांच्या सर्व ट्रीटमेंट ची जबाबदारी घेऊन त्याला पूर्णपणे बरा करण्याची जबाबदारी ग्रुप मार्फत केली जाते ,वयाने वृद्ध असलेले आजी आजोबांना वृद्धाश्रमामध्ये राहण्याची, जेवण्याची आणि मेडिकल ,हॉस्पिटलची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते गोल्डन ग्रुप ही संघटना “रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा “”मानून रुग्णांना आणि वृद्धांना आधार देण्याचे कार्य करत असल्याने या ग्रुपचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे त्यामुळे या ग्रुपचे अनुकरण इतर ग्रुपने किंवा सामाजिक संघटनेने करणे ही काळाची गरज आहे

या गोल्डन ग्रुप सामाजिक संघटनेचे पदाधिकारी पुढील प्रमाणे आहेत —-संस्थापक अध्यक्ष –बाळाभाऊ गांजवे, उपाध्यक्ष –विशाल भाऊ मौले, सचिव –हितेश भाऊ पाटील, कार्याध्यक्ष– प्रफुल्ल भाऊ कदम इत्यादी असून या गोल्डन ग्रुप वैद्यकीय मदत कक्ष सहाय्यक म्हणून मुंबईचे अध्यक्ष प्रमोद राठोड हे ग्रुपच्या माध्यमातून रुग्णांची सेवा करत आहेत प्रमोद राठोड यांच्या ग्रुप मधील पदाधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे चित्राताई, वर्षाताई ,दर्शनाताई, सारिका ताई ,,रवि राठोड ,उमेश पाटील , रुपेश राऊत , शरद पाटील, नलिनी राऊत, इत्यादी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button