महाराष्ट्र

पंजाब : अमृतसर हादरले! सुवर्ण मंदिराजवळ २४ तासांत २ बॉम्बस्फोट …..

टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिराजवळ आणखी बॉम्बस्फोट झाल्याची घटना घडली आहे. २४ तासांतील ही दुसरी घटना आहे. याबाबत माहिती मिळाल्यानंतर बॉम्बशोधक पथक आणि एफएसएल पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. शनिवारी रात्री देखील या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला होता. आता पुन्हा सोमवारीही येथून जवळच आणखी एक स्फोट झाला आहे. जागरण हिंदीच्या वृत्तानुसार आज सकाळी साडेसहा वाजता हा स्फोट झाला. पोलीस आणि सुरक्षा अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.

आज सकाळी झालेल्या स्फोटावेळी रस्त्यावर अधिक रहदारी नव्हती. या घटनेचा तपास सुरू असून उच्चपदस्थ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. फॉरेन्सिक टीमच्या सदस्यांनी घटनास्थळावरून विविध नमुने गोळा केले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button