बहुजन ब्रिगेड महासंघ व विकास नगर ग्रामस्थ यांच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न

माळीनगर प्रतिनिधी .…रियाज मुलाणी , टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. ९९२१५००७८०
विकासनगर अकलूज या ठिकाणी दहावी व बारावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश संपादित केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा बहुजन ब्रिगेड महासंघ व विकास नगर ग्रामस्थ यांच्यावतीने आयोजित करण्यात आला होता.
आयेशा रियाज मुलाणी, जयश्री पिंटू सपताळे, कांचन रोहिदास हनवते, बबली संजय थोरात, साक्षी संतोष थोरात, तनु बजरंग थोरात, वैष्णवी विजय थोरात, पूजा सहदेव कांबळे, आकांक्षा अशोक थोरात, रोहन अनिल थोरात, सचिन संजय थोरात, रामा नाथा थोरात, अजय महादेव अडगळे, या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान कार्यक्रमाचे अध्यक्ष संदीपजी मोहिते, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रियाज मुलाणी, कार्यक्रमाचे आयोजक गणेशभाऊ साठे, पिंटू वायदंडे, अनिल थोरात, या मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ, शाल व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.

प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे संदीपजी मोहिते यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी रोहिदास थोरत,संतोष हनवते, पिंटू सपताळे,अंबादास पाटोळे, सुरेश लोंढे, महेश चव्हाण, कुमार मस्के, बाळासाहेब जाधव, संकेत थोरात, आदि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार आकाश शिंदे यांनी मानले.



