कर्ण बधीर लोकांसाठी सागर खोत बनले तारण हार

टाइम्स 9 मराठी न्यूज रिपोर्टर – सांगली जिल्हा प्रतिनिधी : आनंद सावंत मो. 8007 93 2121
सांगली : घबकवाडी ता. वाळवा ग्रामपंचायत हद्दीतील ऐकायला कमी येत असलेल्या ग्रामस्थांना रयत क्रांती संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सागर खोत यांच्या शुभहस्ते मशीन चे वाटप

महाराष्ट्राचे माजी कृषी व पाणी पुरवठा मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांचे चिरंजीव, युवा नेते सागरभाऊ खोत यांच्या विशेष प्रयत्नातून आज मठवस्ती, खोतवाडी, शिंदेवाडी व घबकवाडी येथील पुरूष व महिला यापैकी ज्यांना ऐकायला कमी येत आहे अशा महिला व पुरुष यांना ऐकायला कमी येणाऱ्या ग्रामस्थांना मोफत कानाला लावण्यासाठी मशीन वाटप करण्यात आल्या

याप्रसंगी रेठरेधरण चे युवक नेते अमोलदादा पाटील, घबकवाडी गांवच्या लोकनियुक्त सरपंच संगीता माणिकराव घबक (वहिनी), माजी आदर्श सरपंच संजय कदम (बापू), म्हसोबा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थाचे चेअरमन बाबासो पाटील, सांगली अर्बन को ऑफ बँकेचे शाखा सल्लागार संचालक बजरंग कदम (आण्णा), महात्मा गांधी तंटामुक्त समिती घबकवाडी चे नवनिर्वाचित अध्यक्ष सयाजीराव खोत (नाना), माजी उपसरपंच युवराज भारती, सुनिल भारती, तुजारपूर चे युवक कार्यकर्ते रोहण बाबर, कृष्णात खोत, हंबीरराव कदम, राहूल मुळीक, दत्तात्रय डंगारणे यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
वैशिष्ट्ये पूर्ण कार्यक्रमाचे संयोजन युवा नेते अमित घबक, दिपकराव खोत, अजित दत्तात्रय कदम, बाबुराव भारती यांनी केले.

पूर्णपणे ऐकायला येत नसणाऱ्या ग्रामस्थ यांना मशीन मिळाल्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.



