बदलापूरच्या “त्या लहानगी” ची घटना घडते आणि पोलिस प्रशासन कुणाच्या सांगण्या वरून आपली भुमिका बदलते…? बदलापूर च्या त्या घटनेने पुन्हा एकदा निर्माण केला व्यवस्थेचा प्रश्न…?

प्रतिनिधी-आमिर मोहोळकर,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
12 व 13 ऑगस्ट 2024 हे दोन दिवस म्हणजे पुरोगामी महाराष्ट्राच्या इतिहासातील काळ्या कुट्ट अक्षरांनी लिहले गेलेले दिवस,बदलापूरचे एके काळचे कट्टर भाजपा वासी राम पातकरांनी अध्यक्ष पद भुषवलेली “आदर्श विद्यालय” या नावाची शालेय संस्था आणि या शालेय संस्थेत शिपाई म्हणून कार्यरत असणारा अक्षय शिंदे याने निष्पाप अशा अवघे तीन वर्षे आणि आठ महिने असे वय असणाऱ्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केलेला दिवस…

लैंगिक अत्याचार झालेली “ती” लहानगी दुसऱ्या दिवशी शाळेत जायला नकार देते आणि हळूच आपल्या माऊली ला बिलगत म्हणते “ए आई,मला शु च्या जागेवर मुंग्या चावतायेत” हे वाक्य ऐकताच त्या लहानगी ला तिची माऊली दवाखान्यात घेऊन जाते,काही वेळातच संबंधित डॉक्टर त्या लहानगी चे चेक अप करुन रिपोर्ट सादर करतात आणि त्या माऊलीचे डोळे अलगद पणे पाणावतात…
ती माऊली जीवाच्या आकांताने ओरडू लागली असेल, कावऱ्या बावऱ्या नजरेने इकडे तिकडे पाहत असेल,क्षणात त्याचे होते का नव्हते झाले होते,मुळात त्या लहानगी ची एकूण परिस्थिती,या गोष्टींचा आपण जरी विचार केला तर हे नेमकं घडतंय काय…? असा सवाल पैदा होतोच…

कसलाही मागचा पुढचा विचार न करता त्या लहानगी ची माऊली आणि त्याचे कुटुंब “आदर्श विद्यालय” मार्गे संबंधित पोलिस स्टेशन ला पोहचतात आणि येथूनच सुरू होते त्यांच्या जीवनाची “संघर्ष यात्रा”,त्या चिमुरडीला न्याय मिळावा हि एकमेव भावना परंतु “सदरक्षणाय खलनिग्रहणाय” यांनी हि गुन्हा दाखल करण्यास उशीर का केला असेल हा प्रश्न देखील उपस्थित होतो…
“आदर्श विद्यालय” त्या नराधमावर कारवाई ऐवजी पोलिस गप्प राहते तर इकडे पोलिस प्रशासन घटनेला 12 तास उलटून गेले तरी गुन्हा दाखल करू शकत नाही,स्थानिक नेत्यांचे या प्रकरणामध्ये हस्तक्षेप सुरु होतात आणि आपल्या सारख्यांना प्रश्न पडायला लागतात,पोलिस त्या “आदर्श विद्यालया” सह त्या “नराधमावर” गुन्हा दाखल का करू शकत नाहीय…?,त्या नराधमाने असे कुठले सत्कर्म केले आहे की,त्या “अक्षय” शिंदेला “अभय” मिळवून देण्यासाठी पोलिस प्रशासन,व्यवस्था आणि महाराष्ट्र सरकार चढाओढ करतात…
अशातच 19 ऑगस्ट चा दिवस उजाडतो,”जयेश वाणी” नावाचे वकील आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वरून संबंधित घटनेची “इथंभुत” माहिती दुपारी दोन च्या दरम्यान जगजाहीर करतात आणि पोलिस प्रशासना सह महाराष्ट्राचे गृह खाते आणि आम् आदमी सुध्दा त्या वेळी खाडकन् जागा होतो…
तो आम आदमी कशा प्रकारे जागा होतो ते बदलापूर च्या रेल्वे स्थानकावरील प्रत्येक हालचाली अवघा देश आणि महाराष्ट्र सुध्दा लाईव्ह पाहत असतो,बदलापूर च्या रेल्वे स्थानकावरील ती पहिली घटना असेल की आम आदमी पोलिस प्रशासना वर बिनधास्त पणे दगड फेक करतो,त्या वेळी पोलिस प्रशासन परत फिरते,जमलेला तो “बेकाबू” जमाव सरकारवर अनेक प्रश्नांची सरबत्ती सुरू करतो…
तो पर्यंत इकडे महाराष्ट्र भाजपा चे सर्वेसर्वा आणि राज्याचे गृहमंत्री फडणवीस साहेब पक्ष संघटना मजबुती साठी दिल्ली येथे पोहचलेले असतात तेंव्हा नेहमीच “संकट मोचक” म्हणून आपली जबाबदारी लीलया पेलणारे “इनशर्ट” धारी गिरीश महाजन चक्क बदलापूर च्या रेल्वे स्थानकावर हजर होतात…
“बेकाबू” झालेल्या जमावातील एक “अबला नारी” पुढे येऊन “संकट मोचकांना” प्रश्न करते,तो असा “त्या चिमुरडी ऐवजी तुमची मुलगी असती तर तुम्हीं काय केले असते”…? या प्रश्नांमुळे बदलापूर च्या त्या रेल्वे स्थानकावर हजर असणाऱ्या प्रत्येकाची आणि लाईव्ह tv पाहत असलेल्या महाराष्ट्र वासीया सह आलेल्या संकट मोचकाची थोड्या वेळ का होईना भान हरपलेले असते,सगळी कडे स्मशान शांतता पसरलेली असते,प्रत्येकाचे मन सुन्न झालेले असते,ते वाक्य ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या मनात काहूर माजलेले असते,सगळ्यांची “मती” मारलेली असते एवढे मात्र निश्चित…
महाराष्ट्र सरकार लाडकी बहिण योजनेचा गाजावाजा करत असताना “लाडकी बहिण सुरक्षित योजना” का राबवत नाही असा प्रश्न हि त्या”बेकाबू” झालेल्या भरगच्च जमावातून निघताना दिसतो,त्या वेळी हिरो वाटणारे पोलिस कुणाच्या सांगण्या वरून “व्हीलेन” ची भुमिका निभावतात…? असा प्रश्न मात्र माझ्या सह सर्वांना पडतो…



