खाजगी हॉस्पिटल ने गोरगरीब रुग्णांची लुटालुट थांबावावी नाहीतर त्यांना कायद्याचे इंजेक्शन दिले जाईल – महेश शिंदे

१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्र स्वाभिमानी ब्रिगेडची स्थापना..
टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
महाराष्ट्र स्वाभिमानी ब्रिगेडच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची संस्थापक अध्यक्ष महेश शिंदे यांच्या उपस्थितीत आणि अध्यक्षतेखाली अकलूज येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.महाराष्ट्र स्वाभिमानी ब्रिगेड च्या लोगोचे अनावरण संस्थापक अध्यक्ष महेश शिंदे आणि बहुजन चळवळीतील ज्येष्ठ नेते विकास दादा धाईंजे , नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस राज्यसचिव वैभव गीते, मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ नेते निनाद पाटील, ॲड नवनाथ भागवत,यांच्या हस्ते करण्यात आले.

बैठकीला म.स्वा.ब्रि चे संजय वाघमोडे ,दुर्योधन गायकवाड ,सोहम बोडके ,शंकर मस्के अक्षय गायकवाड, सनी गायकवाड तुषार मोरे, मोहसीन तांबोळी ,बाळू थोरात सुभाष काळे ,सागर इंगळे ,चिराग महिडा ,आदिवेद डावरे ,बाबा भोसले प्रदीप उघाडे, निखिल उघाडे अझर शेख विशाल मोहिते इतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी महेश शिंदे म्हणाले की गोरगरीब शोषित पीडित जनतेसाठी रुग्णांसाठी लढत राहणार खाजगी दवाखान्यांनी माजल्यासारखे करू नये नाहीतर त्यांना कायद्याचं इंजेक्शन दिलं जाईल.
संजय वाघमोडे ,दुर्योधन गायकवाड शंकर मस्के ,यांनी म.स्वा.ब्रि माध्यमातून पुढील नियोजन करण्यासंदर्भात सुचनापर मनोगत व्यक्त केले.बैठकीला उपस्थित असणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करताना संस्थापक अध्यक्ष महेश शिंदे यांनी ध्येय धोरणे सांगून ब्रिगेड वाढीसाठी जे काम करणारे कार्यकर्ते आहेत अशाच कार्यकर्त्याना पदे दिली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.ब्रिगेडच्या माध्यमातून जनतेला भेडसावत असलेल्या प्रश्नावर आवाज उठवून न्याय मिळवून देण्यासाठी काम करण्याच्या सूचना केल्या.



