अजमेर व अयोध्याकडे जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांना सुरक्षा प्रदान करावी.. पालघर सुन्नी सेवा संस्थेचे अध्यक्ष आरिफ कलाडिया व जाहीर लुलानीया यांची रेल्वे प्रशासनाकडे मागणी
टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640.
राजस्थान मधील अजमेर येथील हजरत ख्वाजा गरीब नवाज यांचे दरगाहचे उर्स महोत्सव 18 जानेवारी रोजी आहे.तर अयोध्या येथील श्री राममंदीराचे भव्य उद्घाटन समारंभ 22 जानेवारी रोजी होणार आहे. देशभरातून मुस्लीम समाज रेल्वे गाडयांव्दारे अजमेर येथे जाण्याकरिता दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मोठया संख्येने रेल्वे प्रवासाने अजमेर येथील दरगाहच्या दर्शनाला जातील. तसेच श्री राम मंदीराच्या उद्घाटन सोहळामध्ये सहभागी होण्याकरिता लाखोच्या संख्येने भाविक रेल्वे ट्रेनव्दारे प्रवास करून अयोध्या येथे जाण्याच्या तयारीत आहेत.
पालघर जिल्ह्यातून देखील मुस्लिम बांधव उर्स निमित्त अजमेरला तर हिंदू बांधव अयोध्येला जाणार आहेत. या सर्वांना योग्य सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी पालघर येथील सुन्नी मुस्लिम सेवा संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष आरिफ कलाडिया , व जाहीर लूलामिया आणि रईस खान यांनी रेल्वे प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे .
काही दिवसापूर्वी गुजरात येथून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे ट्रेनमध्ये सरकारी सेवेत असणाऱ्या एका आर.पी.एफ. जवानाने निर्दोष मुस्लीम समाजाच्या 4 प्रवाशांना सर्व्हिस रायफलने गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यामूळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांमध्ये खास करून मुस्लिम समाजातील प्रवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
पुन्हा अशा प्रकारची घटना घडू नये यासाठी 15 जानेवारी ते 30 जानेवारी दरम्यान पश्चिम रेल्वेच्या गाड्यांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षतेबाबत रेल्वेने रेल्वे डब्यांमध्ये जी.आर.पी. आणि आर.पी.एफ. जवान तैनात करून कोणताही गैरप्रकार होवू नये. याबाबतीत विशेष लक्ष द्यावे .
अशी मागणी पालघर येथील सुन्नी मुस्लिम सेवा संस्थेने मुंबई येथील आर.पी.एफ. चे अधीक्षक, जी.आर.पी. चे डीसीपी व पश्चिम रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांना लिखित निवेदनाद्वारे केली आहे.