महाराष्ट्र

उजनी धरण पूर नियंत्रण कक्षाने दिला भीमा नदी काठच्या गावांना सावधानतेचा इशारा

करमाळा प्रतिनिधी आलिम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

पुणे शहर तसेच परिसरात गेली दोन दिवसापासून मुसळधार पाऊस चालू असल्याने तसेच उजनी धरण सध्या 100% कडे वाटचाल करीत असताना पूर नियंत्रण कक्षाने उजनी धरण परिसरातील भीमा नदीच्या काठी असणाऱ्या सर्व गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे भीमा नदी काठच्या सर्व नागरीकांना कळविण्यात येते की, उजनी धरणाच्या वरील बाजूस असणाऱ्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असून उजनी धरण जलाशय आज दिनांक 4 ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी 10 वाजता 86 % टक्के क्षमतेने भरले आहे.

त्यामुळे पुरनियंत्रणासाठी उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदीपात्रामध्ये आज सायंकाळी 5 वाजता 20000 क्यूसेक्स ने सुरुवातीला पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. विसर्गा मध्ये आवश्यकतेनुसार वाढ होण्याची शक्यता आहे.
तरी भीमा नदी काठच्या सर्व नागरीकांना याद्वारे सुचित करण्यात येते की कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदी मधील शेती पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती दक्षता घ्यावी व पाटबंधारे विभागास सहकार्य करावे ही विनंती असे आवाहन पूर नियंत्रण कक्षाने केले आहे

-

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button