महाराष्ट्र

गोल्डन ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या प्रयत्नामुळे अविनाश सणस अश्विनी सनस या दाम्पत्याने ओटीत घेतले बाळ

उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448

गोल्डन ग्रुप महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष . बाळा भाऊ गांजवे यांच्या मार्गदर्शनाखाली गोल्डन ग्रुप च्या सदस्या चित्रा ताई जाधव यांनी एका नवजात बालकाची संपूर्ण जबाबदारी घेतली होती.

मुंबई येथील अविनाश सनस व आश्विनी सनस राहणार दिवा, मुंबई या पालकांना बाळ नव्हते असे जेव्हा चित्रा ताई जाधव यांना कळले असता त्यांनी त्या नंतर त्यांनी गोल्डन ग्रुप मुंबई वैद्यकिय मदत कक्ष समन्वयक प्रमोद राठोड, आकाश गवळी, ईश्वर राठोड, नम्रता खराडे, शरद पाटील, रवी राठोड, वर्षा राठोड, सारिका आटोळे, रुपेश राऊत, दर्शना राठोड या टीम सोबत त्या पालकांना प्रत्येक्षपणे भेटून त्यांची सविस्तर माहिती घेतली, सर्व गोष्टी योग्य वाटल्या नंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्या बाळाला अविनाश सनस व आश्विनी सनस या पालका कडे सोपावण्यात आले.

त्या बाळाला एक उज्वल भविष्य नक्की भेटेल आणि अविनाश सनस व अश्विनी सनस याच्या घरात एक आनंददाई वातावरण निर्माण झाले.बाळ स्वीकारताना पालकांच्या डोळ्यातून आनंद अश्रू अनावर होत नव्हते.
हे सगळं होऊ शकल गोल्डन ग्रुपच्या प्रयत्नामुळेच त्यामुळे गोल्डन ग्रुपचे जेवढे कौतुक करावे तितके कमीच आहे. गोल्डन ग्रुप चे जसे नाव आहे तसेच कार्य देखील आहे, हे नाकारता येणार नाही गोल्डन ग्रुप हे फक्त नाव नसून तो एक विचार आणि मदतीचा भांडार आहे,

आज ते बाळ एका चांगल्या कुटुंबामध्ये गेले आणि त्याचा आयुष्याच सोन होऊन त्या बाळाचे भवितव्य नक्कीच उज्वल होणार आहे .हे सगळं घडू शकले ते गोल्डन ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष बाळा भाऊ गांजवे, उपाध्यक्ष विशाल भाऊ मौले, सचिव हितेश पाटील, कार्याअध्यक्ष प्रफुल भाऊ कदम आणि सदस्यां चित्रा ताई जाधव, गोल्डन ग्रुप मुंबई वैद्यकीय मदत कक्ष सम्यन्वक प्रमोद राठोड, आकाश गवळी, ईश्वर राठोड, नम्रता खराडे, शरद पाटील, रवी राठोड, वर्षा राठोड, सारिका आटोळे, रुपेश राऊत, दर्शना राठोड, महेश राऊ, नलिना राऊत यांच्या मुळेच,गोल्डन ग्रुप तर्फे अशीच जनतेची सेवा घडो.हेच ईश्वराकडे मागणी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button