१०%रासायनिक खत व खर्च बचत नॅनो डीएपी वापर – सतिश कचरे मंडळ कृषि अधिकारी नातेपुते ( ISO 9001: 2015 )

उपसंपादक -हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448
वरचे वर वाढलेल्या,वाढत चालेल्या रा . खत किमंती , वेळेवर अनुउपलब्धता , वाढलेला उत्पादन खर्च , खराब होत चाले ल्या जमिनी , वाढलेला सामू यावर उपाययोजना करणे काळाची गरज आहे व ते आपल्या हातात आहे. कृषिमध्ये पीकाला युरिया बरोबर मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे रा .खत म्हणजे डीएपी होय . डीएपी च्या ही वजन कमी करून किमंती वाढल्या आहेत व वेळेवर उपलब्ध होत नाही आणि लिकिंग सह घ्यावा लागत आहे .
उपलब्ध तंत्रज्ञान , निविष्ठा, वापरले तर आपण शेतकरी बांधव वरील बाबीवर मात करू शकतो . आपण यापूर्वी चे लेखात १० % रा .खत व खर्च बचत मध्ये १ -हिर वळीचे पीके विविधा प्रकारच्या पेढी २-सरळ खताचा वापर ३- नॅनो युरिया वापर ४ – मातीपरिक्षणावर आधारित संतुलीत खत वापर ५ -ठिंबक सिंचनाद्वारे व फवारणीद्वारे द्रवयुक्त खताचा वापर बाबत माहिती घेतली आहे . या लेखात नॅनो डिएपी बाबत महत्व समजवून घेऊ व १०% रा. खत व खर्चात बचत करू या ! गोळी युक्त डी. एपी किमतीने१८०० ते २१०० रु प्रति बॅग आहे . ह्या एका बॅग च्या तुलनेत लागणारे नॅनो डी.एपी ५०० मिली ६०० रुपयात मुबलक प्रमाणात सहज उपलब्ध आहे.
यामध्ये नत्र ८% व फॉस्फरस १६% असून अतिसुक्ष्म कणानी बनले असून त्याच्या कणाची साईज / आकारमान १०० नॅनोमीटर पेक्षा कमी आहे. नॅनो डीएपी महत्व १- बाजारात सहज , मुबलक उपलब्ध आहे. २ – वहातूक हाताळणी व साठवणूक पॅकिंग खर्च कमी आहे. ३ संपूर्ण भारतीय बनावटीचे जैवंतंत्र इंजिनिअरीग तंत्रज्ञान बनविलेले परकीय चलन वाचविणारे रा खत आहे ४- १०० नॅनो मिटर पेक्षा सुक्ष्म कणामुळे सहज शोषण केले जाते त्यामुळे याची उपयोगीता , उत्पादनक्षमता , कार्यक्षमता उत्कृष्ट आहे. ५ -निसर्ग ,पशु , पक्षी , वनस्पती , मानव ‘ पीके परिसंस्थेला मित्रत्वाचे प्रदूषण मुक्त रा खत आहे. ६ नॅनो कणामुळे पूर्ण शोषण होते यामुळे हरितद्रव्य वाढ ‘ प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया वाढ मुळे कोब उगवन क्षमता वाढते यामुळे दर्जात्मिक उत्पादनात वाढ होते .

७- नॅनो डिए पी सर्व प्रकारच्या बायोस्टीमुलंन्ट , अँग्रोकेमिकल्स , द्रवरूप खते मधून देता येते. ८ – उत्पादनापासून २ वर्षापर्यत प्रदीर्ध सेल्फ लाईफ आहे. ९ नॅनो डिएपी फवारणी व सुक्ष्म सिचनाद्वारे तृणधान्य , कडधान्य , गळीत धान्य , चारपीके , व्यापरी पिके भाजीपाला, फळे , औषधी सुंगधी वनस्पती साठी उस , केळी पीकास उपयुक्त आहे. वापरण्याची पद्धत : – १ बीज ,कंद ,मुळे प्रक्रिया – ३ ते ५ मिली प्रतिलिटर पाण्यासह प्रक्रिया करून पेरणी करावी उगवन क्षमता वाढीसह व्हिगर जोम वाढ दिसून येते. २ – फवारणीसाठी २ ते ४ मिली प्रति लिटर वाढची ‘ फुटवे ‘ फुलोरा अगोदर ‘ दाणे भरणेचे वेळीस फवारणी लाभदायक ठरते . ३ – सुक्ष्म सिचनाद्वारे २% द्रावण करून देण्यात आलेवर लाभदायक ठरते .
पंपानुसार नॅनो डीएपीचे प्रमाण _ नॅनो डीएपी चे टोपन २५ मिलीचे असते त्या प्रमाणे नॅपसॅक स्प्रे साठी २ -३ कॅप ( ५० -७५ मिली) १५ – १६ साठी घेऊन स्प्रे करावा . बुम , पॉवर स्प्रेसाठी ३ -४ कॅप (१०० मिली ) २० – २५ लिटर टॅक साठी घ्यावे व एकरी ४ ते६ टॅक वापरावेत . ड्रोन स्प्रे साठी २ ५०-५०० मिली १०-२० लिटर टॅकसाठी १ एकर पिकाला फवारणीसाठी वापरावे . वापरताना घ्यावयाची काळजी – १ प्रत्येक स्प्रे ला बाटली हलवून घ्यावी २ – चांगल्या उपयोगासाठी फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी करावी .
३- फवारणीनतर १२ तासात पाऊस आला तर नंतर फवारणी करावी ४ उत्पादन तारिख पासून २ वर्षापर्यत वापर करणे फायदेशीर ठरते . वरील सर्व फायदे, उपलब्धता, उपयोगीता, उत्पादनक्षमता, परकिय चलन वाचविणारे ‘ कार्यक्षमता , सर्व परिसंस्था मित्रत्वाचे नाते ठेवाणारे, खर्चाची बचत करणारे, सर्व पीक समावेशक नैनो डीएपीचा वापर करून १० % पेक्षा जास्त रा. खताची व खर्चाची बचत करणे काळाची गरज आहे व असे अहवान मंडळ कृषि अधिकारी ‘ नातेपुते कायालयाने केले आहे.



