महाराष्ट्र

मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये पुरावा म्हणून खोटी कागदपत्रे सादर प्राध्यापक रामदास झोळ यांनी केली जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार राजकीय क्षेत्रात मात्र खळबळ

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

मकाई साखर कारखाना निवडणुकीमध्ये पुरावा म्हणुन खोटी बनावट कागदपत्रे सादर केल्याबाबत प्रा.रामदास झोळ यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार केली आहे.

जिल्हाधिकारी यांना ईमेलद्वारे पाठवलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, मकाई सह. सा. कारखाना निवडणुकीसाठी सभासद या नात्याने अर्ज भरला असुन दि. १९ रोजीच्या छाननीत थकबाकी असल्याचे बनावट कागदपत्रे सादर करुन नामनिर्दशन अर्जांवर हरकती घेण्यात आल्या. हरकतदारांनी घेतलेल्या हरकतींमध्ये संबधीत उमेदवार अथवा त्यांचे सुचक, अनुमोदक यांनी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या लेटरपॅडवर मकाई कारखान्याचा शिक्का असलेले बेबाकी दाखले दिसून आले.

प्रत्यक्षात आदीनाथ सह. सा. कारखाना आणि मकाई सह. सा. कारखाना या दोन्ही संस्थांचा एकमेकांशी संबध नाही. असे असताना सदरचे दाखले हे संबधित हरकतदारांनी खोटे व बनावट तयार करुन ते निवडणुक प्रकियेतील छाननी कामी पुरावा म्हणुन वापरले आहेत. उपरोक्त विषयान्वये सदर बाब गंभीर असुन फौजदारी गुन्हयाच्या अखरात्यातील आहे.

याबाबत लक्ष देऊन २२ मे रोजी असणाऱ्या सुनावणीपुर्वी या प्रकरणाची शहानिशा करुन जिल्हाधिकारी यांनी मला न्याय द्यावा, अशी मागणी प्रा.रामदास झोळ यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button