महाराष्ट्र

सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये गेली सहा महिन्यांपासून औषधांचा तुटवडाजिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या चौकशीची पीपल्स रिपब्लिकन पार्टीची मागणी

टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून औषधांचा तुटवडा असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णांची तपासणी करून निदान केल्यानंतर रुग्णांना देण्यास औषधे उपलब्ध नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करून यातील संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,सार्वजनिक आरोग्यमंत्री,मुख्य सचिव,आरोग्य विभागाचे प्रधान सचिव,आरोग्य आयुक्त धीरज कुमार,विभागीय आयुक्त पुणे,उपसंचालक आरोग्य सेवा पुणे यांचेकडे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी लेखी तक्रारी निवेदनाद्वारे करून कारवाई न झाल्यास ५ जून रोजी आंदोलनाचा इशारा दिला आहे

यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीपभाई जोगेंद्रजी कवाडे यांनी आरोग्य आयुक्त धीरज कुमार यांना समक्ष भेटून त्वरित कारवाई करण्याची मागणी केली.

सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गेली सहा महिन्यापासून औषधांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे.सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा औषध भंडार यांच्याकडे औषधांची ऑनलाईन मागणी करूनही प्राथमिक आरोग्य केंद्रांना औषधे पूरवली जात नाहीत. प्राथमिक आरोग्य केंद्रांनी मागणी केलेल्या औषधांच्या यादी पैकी एखाद दुसरे औषध तेही कमी प्रमाणात पुरवले जात आहे.

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नियमाने ज्या औषधांचा साठा उपलब्ध असणे आवश्यक आहे ती औषधे सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपलब्ध नाहीत.डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून निदान केल्यानंतर त्यांना रुग्णाला देण्यासाठी औषधेच उपलब्ध नाहीत त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नक्की करायचे काय हा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे रुग्णांना बाहेरून औषध घेण्यास सांगितले जात आहे.गेली सहा महिन्यापासून सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या औषधांसाठी आलेला निधी नक्की गेला कुठे याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.

औषधे संपण्याअगोदर त्याचे नियोजन करून नवीन औषधांचा पुरवठा होणे गरजेचे होते परंतु तसे झाले नाही त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सध्या सलाईनवर असून आरोग्य विभागामध्ये सावळा गोंधळ सुरू आहे सोलापूर जिल्हा आरोग्य अधिकारी या पदाचा पदभार या अगोदर डॉ.शितलकुमार जाधव यांच्याकडे होता त्यांची इतरत्र बदली झाल्याने या पदाचा अतिरिक्त पदभार सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सोनिया बागडे यांच्याकडे आहे. त्यामुळे डॉक्टर सोनिया बागडे यांनी सोलापूर जिल्ह्यातील औषधांच्या तुटड्यांवर काय उपाय योजना केल्या याची चौकशी करून यातील संबंधित दोषींवर कारवाई करावी.

सोलापूर जिल्हा आरोग्य अधिकारीपदी नवीन कायम जिल्हा आरोग्य अधिकारी यांची नेमणूक करून सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्वरित सर्व औषधे उपलब्ध करून रुग्णांना औषधे उपलब्ध करून द्यावीत अन्यथा 5 जून रोजी आरोग्य आयुक्त आरोग्य भवन मुंबई कार्यालयासमोर पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे यावेळी माजी खासदार जोगेंद्रजी कवाडे साहेब यांचे स्विय सहाय्यक आनंदजी कडाळे,पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे माळशिरस तालुकाध्यक्ष सचिन कांबळे,इंदापूर तालुका प्रभारी संतोष गायकवाड उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button