राज्यातील शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हा निहाय संघटक व समन्वयक यांच्या निवडी जाहीर —धाराशिव जिल्हा कक्ष संघटक पदी मोईनखान यांची फेरनिवड

उपसंपादक ——हुसेन मुलाणी टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मोबाईल 97 30 867 448
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना सचिव आणि शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षा चे अध्यक्ष खासदार अनिल देसाई यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेल्या शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या जिल्हा निहाय जिल्हा संघटक व कक्ष जिल्हा समन्वयक यांच्या नियुक्ती जाहीर करण्यात आल्या आहेत अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्राद्वारे कळविण्यात आले आहे —–

राज्यातील कक्ष जिल्हा संघटक पदाधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे;- प्रशांत जाधव सातारा- जिल्हा, दत्तात्रय कदम– रत्नागिरी -जिल्हा ,चेतन प्रभूदेसाई -जळगाव जिल्हा, सिद्धाराम म्हमाने- सोलापूर जिल्हा ,गिरीश वाघमारे– बुलढाणा जिल्हा, संदीप चव्हाण- धुळे जिल्हा, अनिल गायखे – नाशिक जिल्हा, मोईन खान पठाण– धाराशिव जिल्हा, मुकुंद जळगावकर –नांदेड जिल्हा,
कक्ष जिल्हा समन्वयक पुढील प्रमाणे प्रदीप्ता पवार -सातारा जिल्हा, सत्यवान फोपे –सिंधुदुर्ग जिल्हा, संदीप जाधव –रत्नागिरी जिल्हा ,दिनेश घाडीगावकर– ठाणे जिल्हा ,इत्यादी जिल्हा कक्ष संघटक व कक्ष जिल्हा समन्वयक यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत



