महाराष्ट्र

कृष्णानंद विद्यामंदिर पाटीलवस्ती येथे “भोंडला” उत्साहात संपन्न

अकलूज( वार्ता ) टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज संचालित कृष्णानंद विद्यामंदिर पाटीलवस्ती येथे “भोंडला” हा पारंपरिक खेळ शनिवार दि . २१/१०/२०२३ रोजी उत्साहात साजरा झाला. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. प्रताप तोरणे सर व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. भानुदास आसबे सर यांचे हस्ते माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते कै. महर्षी शंकरराव मोहिते पाटील व श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या प्रतिमेचे व हत्तीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

याप्रसंगी विद्यालतातील सर्व महिला शिक्षिका , महिला पालक व प्राथमिक व माध्यमिक विभागातील सर्व विद्यार्थिनी यांनी फेर धरून भोंडल्याची विविध चालींची, व तालावरची गाणी गात मुक्तपणे विविध प्रकारे टिपरी वरील दांडिया व गर्भा नृत्य सादर केली. तसेच मुलींनी फुगडी, पिंगा, या पारंपारिक खेळाचे दर्शन घडविले.

शेवटी, सर्व विद्यार्थिनींनी आणलेले विविध प्रकारच्या खिरापती ओळखण्याचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना खिरापतीचा प्रसाद वाटप करण्यात आला. अशा प्रकारे भोंडला हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

सदर कार्यक्रमासाठी गाणी नियोजन श्री. आठवले सर व सूत्रसंचालन व माहिती सहशिक्षिका कु. धाइंजे मॅडम यांनी केले. व आभार प्रदर्शन सहशिक्षिका सौ. मोरे मॅडम यांनी केले. कार्यक्रम पार पाडण्यासाठी देशमुख मॅडम, चेमटे मॅडम, चिंतामणी मॅडम, पठाण मॅडम यांनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button