गोरख बापू रासकर यांच्या दातृत्वाने उमलली शिक्षणाची नवी वाट

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
रावगाव (ता. करमाळा): गावचे सुपुत्र गोरख बापू रासकर (सेवानिवृत्त सेल्स टॅक्स अधिकारी) यांच्या दातृत्वातून व राजीव गांधी वाचनालयाचे सचिव भास्करभाऊ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज पंडीत जवाहरलाल नेहरू विद्यालयामध्ये पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला गावचे कर्तव्यदक्ष सरपंच संदिपभाऊ शेळके, प्रगतशील बागायतदार सखाराम (आबा) पवार, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत शिंदे, पंढरीनाथ राख, आजिनाथ वणवे, दत्तू अण्णा बरडे, भाऊसाहेब मेहेर, बापूसाहेब राऊत, सचिन भवर, पालक प्रतिनिधी राहुल गोसावी, ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब पवार, राजीव गांधी सार्वजनिक वाचनालयाचे सचिव भास्करभाऊ पवार आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.

विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले आनंदी हास्य आणि त्यांच्या डोळ्यात दाटलेली उत्सुकता हे या उपक्रमाचे खरे यश ठरले. शालेय दप्तराच्या रूपाने मिळालेली ही भेट त्यांच्यासाठी फक्त एक वस्तू नाही, तर अभ्यासाची, प्रगतीची आणि उज्ज्वल भविष्याची प्रेरणा आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय कोळेकर सरांनी सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार मानले. ते बोलताना म्हणाले आज या विद्यार्थ्यांच्या पाठीवरची ही दप्तरे म्हणजे त्यांच्या शिक्षणाची शिदोरी आणि आपल्या गावाच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी आहे. समाजातील गोरखबापूंसारख्या दातृत्वशील व्यक्तींच्या पाठबळामुळे तसेच या सर्व मदतीमागे ज्या विचारांची, प्रेरणेची छाप आहे, ते म्हणजे भास्कर भाऊ पवार यांच्या पाठबळामुळे आमची शाळा आणि विद्यार्थी अधिक बळकट होतील.



