सोलापूर च्या बागबान जमीयत चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र आणि कर्नाटक येथील मुस्लिम वधू वरांच्या “परिचय” मेळाव्याची घोषणा…यंदाचे यशस्वी 4 थे वर्ष…

आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क,अकलूज
9890299499
सोलापूर येथील बागबान चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे यंदाच्या वर्षी हि भव्य अशा वधू वर परिचय मेळाव्याची घोषणा करण्यात आली,बागबान चॅरिटेबल ट्रस्ट ने गेल्या चार वर्षांपासून महाराष्ट्रा सह शेजारील कर्नाटक राज्यातील मुस्लिम समाजात येणाऱ्या सर्व घटकांसाठी सोयी चे म्हणुन सोलापूर येथे वधू वर परिचय मेळावा घेण्याची परंपरा याही वर्षी कायम ठेवली अशी माहिती ट्रस्ट चे अध्यक्ष नजाकतअली मंद्रूपकर यांनी टाइम्स 9 चे आमीर मोहोळकर यांच्याशी भ्रमणध्वनी वरून बोलताना दिली…

पुढे बोलताना ते असे हि म्हणाले की मुस्लिम समाजातीलबागवान,शेख,मोमीन,नदाफ,खान,अतर,तांबोळी,मुल्ला,मुजावर,मुलाणी,कुरेशी आदी घटकांसह सर्वांनी याचा लाभ तर घ्यावाच तसेच मुस्लिम समाजातील तलाक शुदा आणि विधवा महिलांनी देखील यात सहभाग नोंदवावा असे आवाहन केले…
सदर च्या वधू वर मेळाव्या मध्ये ज्या ज्या वधू वरांना सहभाग घ्यायचा आहे त्यांच्या साठी 200/ रू रजिस्टर फि असेल,आपले नाव रजिस्टर करते वेळी 4 बाय 6 चे दोन कलर फोटो,दोन बायोडेटा झेरॉक्स आणि दोन आधार कार्ड झेरॉक्स आणणे जरुरी आहे…
बागबान चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आयोजित हा मेळावा रविवार दिनांक 30 जून 2024 रोजी के एम् सी गार्डन,सोशल हायस्कूल समोर,किडवाई चौक सोलापूर येथे होणार असुन सकाळी दहा वाजले पासुन संध्याकाळी पाच वाजेपर्यंत वधू वर परिचयाचे कामकाज सुरू राहणार आहे…

आपले नांव खालील पत्त्यावर रजिस्टर करावे…
नजाकतअली मंद्रूपकर
423, जोडभावी पेठ,मंगळवार बाजार,जिनतुल इस्लाम मशिद च्या जवळ,सोलापूर
मोबाइल नंबर 9922357053
टिप :- दुपारच्या जेवणाची सोय ट्रस्ट तर्फे करण्यात आली आहे…



