मंगळवेढा येथील मुस्लिम समाजाच्या कब्रस्तान मध्ये विविध विकास कामांना सुरुवात…

🎯 जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून “अल्पसंख्याक निधी” मंजूर करून घेण्यात अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना यश…
आमीर मोहोळकर
टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित (दादा) पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा नियोजन समितीच्या मार्फत मंगळवेढा येथील बागवान तांबोळी आतार कब्रस्तान साठी जवळ जवळ वीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून गेल्या महिन्यात पंढरपूर मंगळवेढाचे आमदार समाधान अवताडे यांच्या हस्ते येथील विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले होते…
मंगळवेढा येथील मुस्लिम समाजाच्या कब्रस्तान मध्ये सध्याच्या घडीला विविध विकासकामे चालू आहेत त्या विकास कामासाठी नजीरभाई इनामदार (जिल्हाध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग,अजित पवार गट),लतिफभाई तांबोळी (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट समन्वयक महाराष्ट्र) आणि बिलाल बागवान (ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायजेशन,शहराध्यक्ष)
यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अल्पसंख्याक विकास निधीचा पाठपुरावा केला होता…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांचे दौऱ्याचे नियोजक लतीफभाई तांबोळी
यांनी आज सदिच्छा भेट देऊन सुरू असलेल्या कामाची पाहणी केल्याबद्दल त्यांचे बागवान तांबोळी आतार समाज बांधवांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले…
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक विभागाचे नजीरभाई इनामदार,ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटनेचे शहराध्यक्ष तसेच बागवान जमात चे अध्यक्ष बिलाल बागवान,नगर परिषद पथविक्रेता समितीचे सदस्य रशीद भाई तांबोळी,प्रसिद्ध केळी व्यापारी युसूफभाई बागवान,मतीन बागवान यांच्या सह मुसा बागवान,इरफान बागवान आणि मरवडे येथील अली इनामदार उपस्थित होते…



