महाराष्ट्र

आज पाचवी माळ नवरात्रातली ललिता पंचमी दुर्वाच्या जुड्यांनी सजली करमाळ्याची आई कमलाभवानी!!

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

करमाळा तालुक्यातील श्री देवीचामाळ येथील प्रसिद्ध कमला भवानी मंदिरामध्ये आज ललिता पंचमी निमित्ताने कमलाभवानी देवीची दुर्वांच्या जुड्यांच्या दुर्वाहाराने सजवून महापूजा मांडण्यात आली यावेळी कमलाभवानी मातेला सुवर्ण मुकुट परिधान करण्यात आला तसेच भरजरी श्वेत रंगाचा शालू नेसवून ही महापूजा ओंकार पुजारी यांनी मांडली. आज पाचवी माळ व ललिता पंचमी असल्यामुळे महिलांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती

या महापूजे वेळी बापूराव पुजारी दादासाहेब पुजारी संदीप पुजारी रत्नदीप पुजारी रोहित पुजारी तुषार सोरटे सहदेव सोरटे तुकाराम सोरटे नारायण सोरटे अभिमान सोरटे भाऊसाहेब सोरटे पुरोहित रविराज पुराणिक सुशील पुराणिक यांचे सह मानकरी अभिषेक फुलारी बबन दिवटे हनुमंत पवार पद्माकर सूर्य पुजारी शंकर पवार ईश्वर पवार श्रीकांत गोमे इनताज शेख नंदु जामदार इत्यादी उपस्थित होते नऊ दिवस नवरात्र मध्ये अन्नछत्र मंडळामार्फत भक्तांसाठी उपवासाचे पदार्थाची सोय करण्यात आलेली आहे याचा हजारो भक्त रोज आस्वाद घेत आहे अशी माहिती अन्नछत्राचे संयोजक नवनाथ सोरटे यांनी दिली आहे खाण्याच्या पदार्थाचे स्टॉल व सर्कस बालगोपाळांना आनंद देत आहेत या सर्वांचे सोय ग्रामपंचायत देवीचा माळ यांनी केलेली आहे अशी माहिती सरपंच रेणुका सिद्धेश्वर सोरटे यांनी दिली आहे यावेळी उपसरपंच सचिन शिंदे उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button