दिवसा ढवळ्या पाहून घराचे बंद दार , 16, 57 000 रुपये घेऊन अज्ञात चोरटा झाला फरार.

उपसंपादक—— हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो , 97 30 867 448
संगम तालुका माळशिरस येथील शंकर दत्तू ताटे देशमुख यांच्या घराचा बंद दरवाजा पाहून दिवसाढवळ्या चोरट्याने कुलूप तोडून सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 16, 57000 हजार रुपयावर डल्ला मारल्याची घटना संगम ता. माळशिरस जि.सोलापूर येथे दिनांक 7 मे 2023 रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 वाजण्याच्या दरम्यान घडली असून याबाबत शंकर दत्तू ताटे देशमुख यांनी अज्ञात चोरट्या विरोधात अकलूज पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे
याबाबत अकलूज पोलीसा कडून मिळालेली माहिती अशी की रविवार दिनांक 7 मे 2023 रोजी शंकर दत्तू ताटे देशमुख रा.संगम ता. माळशिरस जि. सोलापूर यांचे घराचा बंद दार पाहून अज्ञात चोरट्याने बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून 52,000 रुपये किमतीच्या लहान मुलांच्या 13 सोन्याच्या अंगठ्या, 40,000 रुपये किमतीचे सोन्याचे लॉकेट, 50,7000 रुपये किमतीचे सोन्याचे गंठण व साखळी 10, 88 000 रुपये किमतीच्या सोन्याच्या पाटल्या 36 ,000 रुपये किमतीची सोन्याची अंगठी, 40,000 रुपये किमतीचे सोन्याचे ब्रासलेट’ 76,000 रु. किमतीचा सोन्याचा लक्ष्मी हार, 36,000 रुपये किमतीची सोन्याची बोरमाळ, 16,000 रुपये किमतीचे सोन्याचे पेंडंट, 36000 रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या , 3 80000 रुपये किमतीचे राणीहार ,35,000 रुपये किमतीचे चांदीचे ताट , 12,000 रुपये किमतीची सोन्याची नथ , आणि 1, 50000 रुपये रोख रक्कम अशी एकूण सोळा लाख 57 हजार रुपये चा ऐवज व रोख रक्कम घेऊन चोरट्याने पोबारा केला.
सदर चोरी झालेल्या घटनास्थळी अकलूज चे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.बसवराज शिवपुजे व अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक– दीप रतन गायकवाड यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन श्वानाच्या च्या मदतीने चोरट्यांचा तपास व माग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला तसेच हातांचे ठसे घेण्यात आले
याबाबत अज्ञात चोरट्या विरोधात अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ३४० / 2023 व भारतीय दंड विधान कलम 454, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दीप रतन गायकवाड हे करत आहेत



