शेटफळ तलाव बचाव कृती समितीच्या लढ्याला यश आल्याबद्दल समिती सदस्यांचा सन्मान

बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी, 8378076123
शेटफळ तलाव बचाव कृती समितीने शेटफळ तलावावरील बेकायदेशीर पाणी परवाने रद्द करणेसाठी दिलेल्या लढ्याला यश आल्याबद्दल समितीच्या सदस्यांचा सन्मान पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी केला.
शेटफळ तलाव बचाव कृती समितीचे कार्याध्यक्ष महादेवराव घाडगे यांच्या बावडा येथील निवासस्थानी समितीच्या सदस्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी समितीचे अध्यक्ष पंडीत पाटील, सदस्य अजित टिळेकर, विजय गायकवाड, अंकूश घाडगे, शंकर घाडगे, रणजीत घाडगे आदि उपस्थित होते.
शेटफळ तलावातून जलसंपदा विभागाने ४४ जणांना दिलेले उचल पाणी परवाने शेटफळ तलाव बचाव कृती समितीने चार वर्ष लढा देवून त्याला यश प्राप्त झाल्याने दहा गावातील शेती सिंचनाचा प्रश्न निकाली काढल्याबद्दल समितीच्या सदस्यांचा सन्मान करण्यात आला. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी पंडित पाटील, महादेवराव घाडगे, अजित टिळेकर, विजय गायकवाड यांचा फेटा, शाल, श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला.
तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आप्पासाहेब जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली घवघवीत यश संपादन केल्याबद्दल त्यांचा सत्कार घाडगे कुटुंबीयांच्या वतीने अंकुश घाडगे, शंकर घाडगे, रणजीत घाडगे यांच्या वतीने करण्यात आला.



