शहर

केळवे समुद्रकिनारी दोन मुलींच्या अपघाता प्रकरणी घोडागाडी चालका विरुद्ध सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी यांनी केला गुन्हा दाखल

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640

पालघर जिल्ह्यातील केळवे समुद्रकिनारी आपल्या कुटुंबीयांसोबत फिरण्यासाठी आलेल्या दोन चिमुकल्या मुलींच्या अपघाता प्रकरणी विळंगी येथील घोडागाडी (टांगा) चालका विरुद्ध केळवा सागरी पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी यांनी गुन्हा दाखल केला आहे.

सोमवार दिनांक 26 जानेवारी रोजी पालघर जिल्ह्यातील केळवे समुद्र किनाऱ्यावर टेंभोडे येथे राहणारी जानव्ही पाटील वय वर्ष (12 )आणि सिया पाटील वय वर्ष (9) या दोघीजणी आपल्या कुटुंबीयांसोबत फिरण्यासाठी आल्या होत्या यावेळी या समुद्रकिनाऱ्यावर 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनानिमित्त सुट्टी असल्या कारणामुळे पर्यटकांची अफाट गर्दी होती.

यावेळी सिया आणि जानव्ही समुद्रकिनाऱ्यावर खेळत असताना त्यांच्या दिशेने भरधाव वेगाने घोडा गाडी आली व या गाडीने या दोघींना ठोकर देऊन ही गाडी जानव्ही हिच्या पोटावरून गेली यामुळे तिला पुढील उपचारासाठी मुंबईला दाखल करण्यात आले आहे.

तर सियाला किरकोळ जखम झाली होती. या अपघातानंतर घोडे गाडीवाला आरोपी पळून गेला होता.या पळून गेलेल्या आरोपीचा केळवा सागरी पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी यांच्या पथकाने शोध घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button