महाराष्ट्र

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने उत्कृष्ट कार्याबद्दल विद्यार्थ्यांचा सत्कार

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

अकलूज : प्रेस संपादक व पत्रकार संघाच्या वतीने गुरुराज पाटील व प्रशांत वाघमोडे या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा त्यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल सत्कार करण्यात आला.

भांबुर्डी तालुका माळशिरस येथील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता ७ वीतील विद्यार्थी गुरुराज धाईंजे व इयत्ता ६ वीतील प्रशांत वाघमोडे या दोन विद्यार्थ्यांनी सापडलेले पाकीट आपल्या शिक्षकांकडे सुपूर्द केले शिक्षकांनी पाकिटाच्या मालकाचा शोध घेऊन त्याला त्याच्या स्वाधीन केले या पाकिटात रोख रक्कम आधार कार्ड, पॅन कार्ड अशी महत्त्वाची कागदपत्रे होती

हल्लीच्या धक्काबुकीच्या काळात या दोन विद्यार्थ्यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने त्या दोघांचा आणि त्यांच्या आई-वडिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सोमनाथ खंडागळे, तालुका अध्यक्ष शशिकांत कडबाने, दीपक वाघमोडे, रणजीत तिकूटे, पांडुरंग धाईंजे, उज्वला धाईंजे संतोष भोसले, बाळू वाघमोडे, सुमन वाघमोडे, राणी वाघमोडे, मुख्याध्यापक अनिल भगत आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button