महाराष्ट्र
माळशिरस तालुक्याचे माजी आमदार रामभाऊ सातपुते यांची पूरग्रस्त भागात पाहणी, तात्काळ मदतीच्या दिल्या सूचना..

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
अकलूज : माळशिरस तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार रामभाऊ सातपुते यांनी नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करून पीडितांना मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. तसेच भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले.

या कार्यक्षम व जनहितकारी भूमिकेमुळे रामभाऊ सातपुते यांचे जनतेतून कौतुक होत आहे.



