महाराष्ट्र
राज्याच्या सत्ता संघर्षाचा निकाल उद्या सरकार राहणार की कोसळणार?

माळीनगर प्रतिनिधी .…रियाज मुलाणी , टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 9921500780
संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा निकाल येण्याची वेळ आता आली आहे .उद्या गुरुवारी सुप्रीम कोर्ट या संदर्भात निकाल देणार आहे. त्यामुळे शिंदे सरकार राहणार की कोसळणार , १६ आमदार अपात्र ठरणार की पात्र, सुप्रीम कोर्ट ऐतिहासिक निर्णय देणार का,
आयाराम गयाराम साठी सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार, शिवसेना कोणाची, लोकशाही आहे का नाही,या सर्व जनतेच्या मनात सुरू असलेल्या प्रश्नांची उत्तरे सुप्रीम कोर्ट उद्या देण्याची दाट शक्यता आहे सर्व सत्ता संघर्षातील ज्या प्रलंबित याचिकांचा निकाल एकत्र लागण्याची शक्यता आहे. जनतेला निकाल थेट कोर्टातून पाहता येणार.



