करमाळा तालुक्यातील शेलगाव वांगी येथे केळी संशोधन केंद्र होण्यासाठी हालचालींना वेग माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या प्रयत्नांना येणार यश

करमाळा प्रतिनिधी
अलीम शेख
मोबाईल नंबर 98 50 68 63 60
माजी आमदार नारायण पाटील यांच्या पाठपुराव्यास यश येणार असून करमाळा तालुक्यातील शेलगाव (वांगी) येथे केळी संशोधन केंद्र होण्यासाठीच्या हालचालींना आता शासनस्तरावर वेग आला आहे. याबाबत माजी आमदार नारायण पाटील यांना विचारले असता त्यांनी सांगितले की करमाळा तालुक्यातील शेलगाव वांगी येथे केळी संशोधन केंद्र व्हावे ही मागणी आपण सतत करत आलो आहोत यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री यांना निवेदने दिली आहेत.

तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदय यांचेशी प्रत्यक्ष भेटून चर्चा केली आहे. करमाळा तालुक्यातील केळी उत्पादनाची विक्रमी लागवड आणि त्यात सातत्याने होत असलेली वाढ पाहता या भागातून चांगल्या प्रतीची केळी उत्पादित व्हावी आणि आंतरराष्ट्रीय बाजारात या भागातील केळी प्राधान्याने मागितली जावी, यासाठी केळी उत्पादकांना मार्गदर्शन, केळी नवीन जातीचे संशोधन, रोगावर नियंत्रण आदी साठी या भागातच केळी संशोधन केंद्र उभारले जावे ही मागणी आपण लावून धरली. आज याबाबत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे कुलसचिव या पदावर कार्यरत असलेले श्री नामदेव शिर्के यांचेशी आपण स्वतः चर्चा केली असता या महिनाभरात या प्रस्तावित केळी संशोधन केंद्रास अंतिम मान्यता दिली जाणार असल्याचे त्यांनी मला आश्र्वासित केले आहे. यामुळे काही वर्षांपासून पाठ पुरावा केला त्यास यश येणार अशी खात्री यावेळी माजी आमदार नारायण पाटील यांनी व्यक्त केली.



