शहर
बावडा प्राथमिक आरोग्य केंद्रात जन औषधी दिन साजरा

बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी, मोबा – 837806123
- पुणे जिल्हा परिषद, इंदापूर पंचायत समिती व प्राथमिक आरोग्य केंद्र बावडा यांच्या संयुक्त विद्यमानाने जन औषधी दिन साजरा करण्यात आला. सरपंच किरण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
प्राथमिक आरोग्य केंद्र बावडा येथे जन औषधी दिन साजरा करण्यात आला. सरपंच किरण पाटील, सदस्य दादासाहेब कांबळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिषेक ताटे, डॉ. ज्ञानेश्वर बाहेगव्हाणकर, राजेंद्र अनपट, शरद खाडे, आकाश शिंदे, स्वाती माने, वैशाली कांबळे व आशा सेविका अविंदा जाधव, रोहीणी कुंभार आदि उपस्थित होते.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र पातळीवर पुरवठा होणाऱ्या औषधांची व शासनमान्य जन औषधी केंद्र ( जेनरिक औषधे दुकान ) येथे उपलब्ध औषधें यांची सविस्तर माहिती रुग्ण व लाभार्थ्यांना देण्यात आली. औषधे त्यांचे उपयोग, दुष्परिणाम ( Side Effect ) याचीही सविस्तर माहिती देण्यात आली.
प्रास्ताविक रमाकांत म्हसवडकर यांनी केले तर आभार चिंतामणी गायकवाड यांनी मानले. यावेळी नागरीक, रूग्ण उपस्थित होते.




