चिकलठाण परिसरातील वादळी वाऱ्याने नुकसान झालेल्या केळी पिकाचे मकाई साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांनी केली पाहणी, शासकीय यंत्रणेला दिल्या पंचनामा करण्याच्या सूचना

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
चिकलठाण परिसरातील वादळी वाऱ्याने केळी पिकाच्या नुकसानीची मकाईचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी दत्तात्रय गुंड,जोतीराम डीगे, हर्षाली नाईकनवरे, पुरूषोत्तम पोळ यांच्या पिकाची पहाणी करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भेटी देऊन त्यांच्याशी चर्चा केली तर शासकीय यंत्रणेला पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या
शुक्रवारी दुपारी झालेल्या वादळी वाऱ्याचा चिखलठाण शेटफळ परिसरातील केळी पिकाला मोठा फटका बसला अनेक शेतकऱ्यांची केळीच्या बागा भुईसपाट झाल्या आहेत.शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे करमाळा तालुक्याचे तहसीलदार विजय जाधव व तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे यांनी महसूल व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना प्रत्येक गावात पाठवून झालेल्या नुकसानीची प्राथमिक माहिती घेतली आहे ही माहिती शासनाकडे पाठवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्याचे काम लवकरच पुर्ण करण्यात येईल असे सांगितले आहे.

परिसरातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले याची माहीती मिळताच मकाई कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी शेटफळ चिखलठाण कुगाव येथील नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांसमक्ष अधिकाऱ्यांशी संपर्क साधून नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे करून त्यांना भरपाई मिळावी अशा सूचना अधिकाऱ्यांना फोन करून पंचनाम्यापासुन एकही शेतकरी वंचित राहाणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना केल्या आहेत.



