महाराष्ट्र

जि.प.प्राथमीक शाळा शिंदेवस्ती नंबर २ येथे वार्षिक स्नेहसंमेलन व विविध गुणदर्शन कार्यक्रम थाटामाटात साजरा

टाईम्स 9 प्रतिनिधी :

महेश मोहिते मो.8380848673

मौजे शिंदेवाडी येथील शिंदेवस्ती नंबर २ तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर  प्राथमिक शाळा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम थाटामाटात साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन शिंदेवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय श्री सिद्धेश्वर भरते. डॉ. जे जे चोपडे (एम.एस)श्री .दशरथ शिंदे  शिंदेवाडी च्या सरपंच श्रीमती शारदा शिंदे .पोलीस पाटील डॉ .विनोद देशमुख .शिंदेवाडी केंद्रातील सर्व शिक्षक वृद्ध यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीम.शहाणे मॅडम यांनी केले.

त्यांनी स्नेहसंमेलन कार्यक्रमाची रूपरेषा मांडली .व शाळेच्या शैक्षणिक वर्षभर राबवलेल्या विशेष उपक्रमाचा आढावा घेतला.व पालकाशी संवाद साधला .पालकाकडून सांस्कृतिक कार्यक्रमा साठी वर्गणी 75 हजार रुपये जमा करण्यात आली .

मुख्याध्यापिका श्रीमती: सोनाली केशव शहाणे. सहशिक्षिका: श्रीमती शबाना दादेखान ‌इनामदार.

स्वयंसेविका :कुमारी; समीक्षा तानाजी जाधव .

व्यवस्थापन समिती अध्यक्ष:सौ .अर्चना महादेव साळुंखे व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष: श्यामल राहुल शिंदे .

सर्व व्यवस्थापन समिती सदस्य या सांस्कृतिक कार्यक्रमात विविध नृत्यांनी प्रेक्षकाचे मने जिंकली. या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button