शहर

चहा विक्रेते बाळासाहेब तांबोळी यांचा मुलगा झाला अभियंता.पहिल्याच प्रयत्नात इरफान तांबोळी यांनी मिळवले यश,

उपसंपादक—–हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मो. 9730 867 448

परिस्थिती अडचणीची ठरत नाही त्यासाठी फक्त परिस्थीची जाणिव असायला पाहिजे. पहाटे पाच वाजता चहा विक्री करण्यासाठी जाणारा माझा बाप आणि सकाळी आठ वाजता अंगणवाडीतील चिमुकल्यांचे भविष्य घडविण्यासाठी जाणारी माझी आई या दोघांच्या कष्टातून प्रेरणा घेवून मी माझे भविष्य घडविले असे विचार पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात ४० वी रँक घेवून उत्तीर्ण झालेला व सहाय्यक अभियंता पदी निवड झालेला भोसे (ता. पंढरपूर) येथील इरफान बाळासो तांबोळी यांनी मांडले.अतिशय गरीब परिस्थिती बसस्थानकावर छोटीशी चहा व सरबताची टपरी पहाटे पाच वाजलेपासून ते सुरु करण्यासाठी वडिलांची चाललेली धडपड डोळ्यासमोर कायम असायची.

शैक्षणिक खर्चासाठीची ओढाताण या सगळ्या परिस्थितीने माझ्यात शिकण्याची जिद्द निर्माण केली. त्यासाठी आई वडिलांनी मोलाची साथ दिली. म्हणून जीवनात नुसते ध्येय निश्चित करून उपयोग नाही त्यासाठी अपार कष्ट करण्याची तयारी असावी लागते तरच ध्येयापर्यंत पोहोचणे शक्य असते असे तो म्हणाला.प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोसे, माध्यमिक शिक्षण यशवंत विद्यालय भोसे येथे तर महाविद्यालयीन शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथे पूर्ण करून शासकीय इंजिनीअरिंग कॉलेज ऑफ कराड येथे सिव्हील इंजिनिअरची डिग्री पूर्ण केली.

डिग्री करत असतानाच ऑनलाईन क्लासेस करून लोकसेवा आयोगाचा अभ्यास केला. त्यानंतर पहिल्याच प्रयत्नात राज्यात चाळीसावी रँक घेवून उत्तीर्ण झालो आणि कष्टाचे चीज झाल्याचे आणि आईवडिलांचे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद झाल्याचे इरफान याने सांगितले.
यावेळी त्याने कोणत्याही क्षेत्रात यश मिळवणे सोपे नसते परंतु जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असली कि यश हे मिळतेच असे सांगितले.

इरफान तांबोळी याच्या यशाबद्दल सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस चे युवक जिल्हाध्यक्ष तथा भोसे गावचे सरपंच गणेश पाटील व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करून त्याच्या पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button