शहर

माळशिरस तालुका व अकलुज शहर फोटो ग्राफर संघटनेचा स्नेह मेळावा संपन्न

उपसंपादक ———हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448

माळशिरस तालुका व अकलूज शहरव व परिसर फोटो ग्राफर संघटनेचा स्नेह मेळावा 2023 व वर्कशॉप संपन्न झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणुन मुंबई चे अरुण कणसे तर सोलापूर चे यशवंत बिराजदार उपस्थित होते

या प्रसंगी यादोन्ही अतिथीचे मोलाचे मार्गदर्शन झाले,तसेच सोलापूर .दत्ता सर,आनंद सर, अमोल सर,संतोष सर, ज्ञानेश्वर सर हे हि आवर्जून उपस्थित राहून मोलाचे मार्गदर्शन केले तसेच जेष्ठ फोटोग्राफर .गायकवाड मामा, एम.आर., हरिभाऊ बनसोडे,गंगाधर मामा यांनी आपआपले मनोगत व्यक्त केले

आणि अकलूज तसेच परिसरातील सर्व फोटोग्राफर मित्रांनी उपस्थित राहून फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ माने व उपाध्यक्ष कादर शेख यांच्यावर जवाबदारी सोपवून विश्वास दाखवला त्याबद्दल अध्यक्ष ,व उपाध्याक्ष यांनी उपस्थित सर्व फोटोग्राफर बांधवांचे आभार व्यक्त करुन असाच विश्वास आमच्यावरती यापुढेही ठेवावा आणि आम्हाला संघटनेचे कार्य करण्याची संधी दिली आणि आपल्या संघटनेच्या प्रगती साठी सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button