इंदापूर – रेडा- बोराटवाडी एसटी बंद असल्याने विद्यार्थी, महिला, जेष्ठ नागरिक व रुग्णासह प्रवाशांची मोठी गैरसोय.

टाइम्स 9 मराठी न्यूज
प्रवाशांना निमगाव केतकी, वडापुरी, वकील-वस्ती, बावडा दहा ते पंधरा किलोमीटर करावे लागते प्रवासासाठी पायपीट
इंदापूर – रेडा – बोराटवाडी ही एसटी बस सेवा आठ दिवसापासून बंद असल्याने पंधार-वस्ती, काटी , जाधववाडी, रेडा, रेडणी, बोराटवाडी तसेच खोरोची, शहाजीनगर अशा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंदापूर सारख्या ठिकाणी माध्यमिक, उच्च माध्यमिक, कॉलेज, आयटीआय व विविध शिक्षणासाठी, कोर्सेससाठी जाण्यासाठी मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. विद्यार्थी आणि अनेक नागरिकांनी लेखी अर्ज देऊन सुद्धा इंदापूर बसस्थानक , डेपो मॅनेजर यांनी त्या अर्जाला केराची टोपली दाखवल्याची चर्चा असून मनमानी कारभार चालला असल्याचे बोलला जात आहे.सदर इंदापूर बस स्थानकाचे डेपो मॅनेजर हे उन्हाळी विद्यार्थी सुट्टीचे कारण देत उडवाउडवीची उत्तर देऊन नागरिकांची दिशाभूल करत असल्याची चर्चा आहे. नुकतचे महाराष्ट्र शासन यांनी महिलांसाठी अर्धे तिकिटाची सवलत सुरू केली आहे, त्या सवलतीपासून ग्रामीण भागातील महिला वंचित राहतात याला जबाबदार कोण ?
निरा-भिमा परिसरातील सात ते आठ गावातील आणि वाड्या वस्तीवरील महिला, पुरुष, जेष्ठ नागरिक यांना इंदापूर सारख्या ठिकाणी सरकारी रुग्णालयात, खाजगी रुग्णालयात जाण्या – येण्यासाठी येजा करावे लागते त्यांची मोठी गैरसोय व हाल होत आहेेत याला जबाबदार कोण ? स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही वर्षांनी एसटी बससाठी बावडा, वकीलवस्ती, वडापुरी, निमगांव केतकी सारख्या ठिकाणी नागरिकांना एसटी बसला बसायला जावे लागत होते ती अवस्था पंधारवस्ती, काटी, जाधववाडी, रेडा, रेडणी, बोराटवाडी, खोरोची येथील नागरिकांची झाली आहे. सदरची एसटी बंद करून खाजगी वाहतुकीला प्रोत्साहन दिलं जातं का ? या सर्व बाबतीत नागरिकांमध्ये मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे.

वरिष्ठाच्या आदेशाने ग्रामीण भागातील एसटी बंद – डेपो मॅनेजर हनुमंत गोसावी
सदर एसटी बंद अनेक विद्यार्थी, नागरिकांनी आमचे इंदापूर तालुक्यातील इलेक्ट्रॉनिक मीडिया व प्रिंट मीडियाचे इंदापूर तालुका प्रतिनिधी कैलास पवार यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी इंदापूर बसस्थानक व डेपो मॅनेजर यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला असता त्यांनी वरिष्ठाच्या आदेशाने ग्रामीण भागातील एसटी बंद केल्याचे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांना सुट्टी असल्यामुळे एसटी बंद केल्याचे कारण सांगितले. याबाबत इंदापूर आगार येथील कार्यालयात जाऊन पाहणी केले असता नवीन रुजू झालेल्या एक अधिकाऱ्याला माहिती विचारली असता त्यांनी पहिल्यांदा उडवाउडवीची उत्तरे दिली. सदरच्या कार्यालयात दहा वाजल्यापासून साडेअकरा ते पावणे बारापर्यंत अधिकाऱ्याची वाट पाहिली असता संबंधित अधिकारी उपस्थित नव्हते बाहेर कुठेतरी आहेत असे उत्तरेे मिळत होती. इंदापूर ग्रामीण भागातील एसटीचा प्रश्न हा कधी सुटणार असा प्रश्न निर्माण होत आहे. नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयीला जबाबदार कोण ? असा सवाल उपस्थित होत आहे.
विद्यार्थी, नोकरदार वर्ग, सामाजिक संघटना, प्रवासी आंदोलन करणार असल्याची चर्चा ?
इंदापूर शहर व तालुक्याच्या ठिकाणी शासकीय कार्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती, सरकारी निमसरकारी रुग्णालय,विविध कॉलेज, कोर्सेससाठी विद्यार्थ्यांना, नागरिकांना, रुग्णांना,नोकरदार वर्ग तसेच पंधारवस्ती, काटी, रेडा,रेडणी, बोराटवाडी, खोरोची,जाधववाडी या गावातील अनेक शेतकरी आपल्या शेतातील भाजीपाला, फळे इंदापूर येथील मार्केटमध्ये विक्रीसाठी नेण्यासाठी ही एसटी बस महत्वाची असून बंद असल्याने खूप मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांना सुट्टी असल्यामुळे सकाळी ६ वाजता. एसटी बंद असले ते ठिक आहे पण सकाळी ९ वाजताची इंदापूर- रेडा- बोराटवाडी ही महत्त्वाची एसटी बस सेवा विद्यार्थ्यांच्या सुट्टीचे कारण करून बंद केल्याने वरील सर्वच घटकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे सामाजिक संघटना, विद्यार्थी, प्रवासी, शेतकरी, नोकरदार वर्ग, इंदापूर बसस्थांनक, इंदापूर आगारप्रमुख, डेपो मॅनेजर यांच्या विरोधात आंदोलन करणार असल्याचे जोरदारर चर्चा आहे.



