महाराष्ट्र

पालघर लोकसभा बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील यांच्या प्रचाराला महिला पुरुषांसह ज्येष्ठ नागरिकांचा पुढाकार

टाईम्स 9मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक-7030516640

विरार शिरसाड भामटपाडा येथिल साई मंदिरात बाबांचे दर्शन घेत बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील यांनी लोकसभा निवडणूक प्रचाराचा नारळ फोडून बुधवार दिनांक 8 मे 2024 रोजी प्राचाराला सुरुवात केली आहे.

यावेळी राजेश पाटील यांच्या प्रचाराला या भागातील बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व महिला पुरुषांसह ज्येष्ठ नागरिकांनी देखील सहभाग घेतला होता. लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितिज ठाकूर, बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील यांनी केलेल्या धडाकेबाज समाजोपयोगी व जनकल्याण कामांना प्रचंड प्रतिसाद देत हे नागरिक बहुजन विकास आघाडीचे पालघर लोकसभा उमेदवार राजेश पाटील यांचा प्रचार मोठ्या उत्साहात करत होते.

यावेळी आमदार राजेश पाटील यांच्यासोबत माजी खासदार बळीराम जाधव, ठाणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे चेअरमन राजेंद्र पाटील,वसई पंचायत समितीचे सभापती अशोक पाटील, माजी नगरसेविका जयश्री कीनी,कान्हेय्या भोईर,मिलिंद घरत,जिल्हा परिषद सदस्य कृष्णा माळी ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पांडुरंग पाटील आणि बाजार समितीचे सर्व संचालक विभागातील आजी माजी सरपंच,उपसरपंच,सदस्य तसेच मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button