महाराष्ट्र

रमजान महिन्यात दिली जाणारी जकात बाबत

टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

जकात आणि रमजान याचा अर्थ वेगळा असला तरी याचा घनिष्ट संबंध आहे. जास्तीत जास्त लोक जकात रमजान महिन्यातच देतात कारण रमजान मध्ये जकात दिल्याने पुण्य वाढते. परंतू जकात कधीही दिली तरी चालते. आपल्या वर्षभरातील कमाईतून आपला संपूर्ण खर्च जाउन शिल्लक राहिलेली रक्कम असते त्यावर जकात काढली जाते जकात धान्य, कपडे किंवा पैशाच्या रुपात दिली जाते. श्रीमंत, मालदार व्यक्त्तीनी गरीब विधवा ,अपंग ,अनाथ गरजू लोकांना मदतीच्या रुपात दिली जाते. जकात म्हणजेच इस्लामी टैक्स शेकडा अडीच टक्के या प्रमाणे दिली जाते.

उदा: १०००रु मध्ये २५रु .इस्लामी टॅक्स राहील : ८००रु मध्ये २० रु.आणि ७०० रु मध्ये १७.५० पैसे या प्रमाने जकात् काढून गरीब गरजुंना दिली जाते किंवा मदरशांमध्ये नेऊन दिली जाते. जकात असहाय, अपंग गरजुंना मोकळ्या मनाने देउन पुण्य मिळवण्याचा प्रयत्न केला जातो पवित्र कुरआन मध्ये जकात कशी द्यावी याचा उल्लेख सवीस्तर केला गेला आहे. ज्याच्या कडे जमीन जुमला आहेत पण तो कर्जबाजारी असेल तर त्याच्यावर जकात फर्ज (कर्त्तव्य) नाही. जकात चांगल्या कामासाठी लोकांच्या भल्यासाठीच खर्च करण्यात येते. आपल्या कडे साढे सात्तोळे चांदी किंवा साढ़े सात तोळे सोने या पेक्षा जास्त असेल तर त्यावर इस्लामी टॅक्स जकात द्यावी लागते. जकात आणि रोजा म्हणजे गुन्हेगारी वृत्ती पासून वाचवणारी ढाल आहे.

नूरजहान फकरुद्दीन शेख

गणेशगाव ता. माळशिरस जि. सोलापूर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button