शहर
अकलूज नगर परिषदेने “रमजान ईद” निमित्त इदगाह मैदान कब्रस्तान व दफनभूमीची स्वच्छता करण्याची निवेदनाद्वारे मागणी

उपसंपादक—–हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मो .9730 867 448
देशात सर्वत्र दिनांक 22 एप्रिल 2023 रोजी मुस्लिम समाजचा पविञ रोजा चा रमजान महिना संपतो व रमजान ईद साजरी केली जाणार आहे आणि ईद निमित्त मुस्लिम बांधव प्रथम इदगाह मैदानावर पारंपारिक पध्दतीने ईद ची नमाज पठण करण्यासाठी जातात

आणि नमाज पठणा नंतर सर्व मुस्लिम बांधव आपआपले पूर्वज व वाडवडील यांच्या समाधीवर दफनभूमीत फुल व चादर अर्पण करण्यासाठी जात असातात त्या अनुषंगाने इदगाह मैदान व दफन भूमीमध्ये अकलुज नगर परिषदेच्या वतीने स्वच्छता करून द्यावी व पाण्याचा टँकर उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी अकलूज शहर मुस्लिम समाजाच्या वतीने नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.



