महाराष्ट्र

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती अकलूज आणि परिसरात उत्साहाने साजरी

उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448

स्त्री शिक्षणाचे प्रणेते ज्येष्ठ समाज सुधारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची 196 वी जयंती अकलूज आणि परिसरातील माळेवाडी यशवंत नगर येथे मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली

या जयंतीनिमित्त महामानवास अभिवादन करण्यासाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजय सिंह मोहिते पाटील यांनी अकलूज येथील जुने एसटी स्टँड समोरील भाजी मंडई येथील महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले

याप्रसंगी सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे संघटन महामंत्री धैर्यशील मोहिते पाटील अकलूज ग्रामपंचायत चे माजी सरपंच किशोर सिंह माने पाटील व शिवतेसिंह मोहिते पाटील यांनीही या महामानवास अभिवादन केले तसेच याप्रसंगी अकलूज मधील आजी-माजी सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button