छञपती संभाजीराजे, व उदय सांवत यांची स्पीड बोट जेट्टीच्या खांबावर आदळली; दोघेही सुखरूप .

उपसंपादक——हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मो. 9730 867 448
मुंबईकडून अलिबागला स्पिडबोटने येताना सोमवारी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत आणि संभाजीराजे बालंबाल बचावले. बोटीच्या अतिवेगामुळे मांडवा जेट्टीजवळ धक्क्याला न थांबता सुमारे ५० फुटपुढे भरकटत जाऊन किनाऱ्यावर आदळली. अकस्मितपणे बसलेल्या या धक्यामुळे ते बोटीतच पडले. सुदैवाने दोघाना कसलीही दुखापत झाली नाही.

मात्र स्पीड बोट चालकांचा बेफिकरीपणा चव्हाट्यावर आला आहे.पालकमंत्री सावंत यांची स्पीड बोटमध्ये अपघात होण्याची ही दुसरी घटना आहे. काही दिवसापूर्वी त्यांची बोट बंद पडली होती.

शिवराज्याभिषेक काचे यंदाचे 350 वे वर्ष आहे राज्य सरकारकडून हा सोहळा धुमधडाक्यात साजरा करण्यात येणार असून त्याबाबत नियोजन बैठकीसाठी रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे, पालकमंत्री सामंत यांनी जिल्हा प्रशासन व पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांची अलिबाग येथील मुख्यालयात बैठक बोलावली होती त्यासाठी दोघे मुंबईतून एका खाजगी कंपनीच्या स्पीड बोटीने अलिबागसाठी रवाना झाले. मांडवा जेट्टीजवळ आले असताना चालकाचे बोटीच्या वेगावरील नियंत्रण सुटून ती समुद्राच्या किनारा असलेल्या दोन खांबावर जाऊन आदळली. तेथून परत मागे येऊन जेट्टिवर थांबविण्यात आली.




