शहर

बारामती येथील सारिका आटोळे यांची अखिल एकता उद्योग व्यापार मंडळाच्या महिला प्रदेश अध्यक्षपदी निवड!

उपसंपादक——हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मो. 9730 867 448

आज आपल्या समाज बांधवांसाठी निश्चितच एक अभिमानास्पद बाब आहे की,आपल्यातील बारामती येथील सनज्योत बहुउद्देशिय संस्थेच्या अध्यक्षा सारिका अंबादास आटोळे यांची महिला उद्योजक म्हणून नाव कमावले आहे तसेच त्यांच्या कार्याची दखल घेऊन नुकतीच त्यांची एकता उद्योग व्यापार मंडळा’च्या महिला प्रदेश अध्यक्षपदी संघटनात्मक नियुक्ती करण्यात आली असल्याचे पञ अखिल भारतीय एकता व्यापार मंडळाचे राष्ट्रीय महासचिव आर्यन शुक्ला यांनी दिले असुन त्यांच्या निवडीने सर्वञ आभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

आज सर्वत्र महिला आघाडीवर असताना, सारिका अंबादास आटोळे यांनी पारंपरिक शेती व्यवसाय तसेच कौटुंबिक जबाबदारी सांभाळत एक यशस्वी महिला उद्योजक म्हणून स्वतःचे नाव प्रस्थापित केले आहे.

माळेगाव,बारामती परिसरात दीपस्तंभ फाउंडेशनच्या माध्यमातून भरतीपूर्व पोलीस प्रशिक्षण आणि अभ्यासिका सुरू केल्याने त्यांचे नाव आपणा सर्वांना परिचित आहे

आज आपल्या समाज बांधवांमध्ये अधिकाधिक महिला उद्योजकांची गरज आहे. एका अर्थाने फक्त महिलांच्या नव्हे तर पर्यायाने आपल्या समाजाच्या आर्थिक सबलीकरणाचा, उन्नतीचा तो एक मार्ग आहे. ‘काम मागणाऱ्यांपेक्षा काम देणाऱ्या व्यक्ती’ होणं अधिक महत्त्वाचे आहे!

सारिका अंबादास आटोळे यांच्या द्वारे महिला उद्योजकतेचा हा एक नवीन आदर्श आपणा सर्वां पुढे खंबीरपणे उभा राहिला आहे.समाजातील इतर महिलांसाठी ही बाब प्रेरणादायी आहे

आज सारिका अंबादास आटोळे यांना ‘अखिल एकता उद्योग व्यापार मंडळा’च्या माध्यमातून, महाराष्ट्र राज्याच्या महिला प्रदेश अध्यक्ष म्हणून राज्य पातळीवर काम करण्याची संधी मिळाली आहे.त्या तिथेही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविल्या शिवाय राहणार नाहीत!

आपणा सर्वां तर्फे, व टाइम्स 9 मराठी न्युज चॕनेल च्या वतीने सारिका आटोळे यांना नवीन जबाबदारी बाबत हर्दिक शुभेच्छा.तसेच त्यांचा आपणा सर्वांवर लोभ आहेच पण तो भविष्यातही वृध्दींगत होवो! ही सदिच्छा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button