महाराष्ट्र

कॉरिडॉरसंबंधी गारवाड भूसंपादनासाठी तहसीलदार समोर उपोषण.

लक्ष्मीकांत कुरुडकर. अकलूज(प्रतिनिधी)

बंगळुरू – मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरमध्ये गारवाड (ता. माळशिरस) या गावाचा व त्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी देऊ केलेल्या साडेचार हजार एकर जमिनीचा समावेश झाला पाहिजे, या मागणीसाठी माळशिरस तालुक्यातील ग्रामस्थ व सर्व पक्षीय गुरुवारी (दि. ६) माळशिरस तहसीलसमोर लाक्षणिक उपोषण करणार आहेत. तालुक्यातील जनतेला यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. कॉरिडॉरसाठी दोन लाख कोटींची मंजुरी मिळाली आहे. सध्या म्हसवड व धुळदेवची २९०० हेक्टर जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकल्पासाठी कल्पनाराजे भोसले यांनी त्यांची गारवाडमधील १७९३ हेक्टर जमीन देऊ केली आहे. मात्र जमिनीचे संपादन झाले नाही.

लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे अडचणी येत आहेत. दि. ६ एप्रिल रोजी तहसील कार्यालय माळशिरस येथे लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. जर तीन महिन्यांत गारवाडचा इंडस्ट्रियल कॉरिडॉरमध्ये समावेश नाही झाला तर माळशिरस तालुक्यातील दोन्ही आमदारांना गावात प्रवेश बंदी करणार आहे, असे ग्रामस्थांनी सांगितले. या वेळी अॅड. सोमनाथ वाघमोडे, भानुदास सालगुडे, गणेश इंगळे,किशोर सुळ, अजित बोरकर, शिवराज पुकळे, सोमनाथ पिसे, राहुल बिडवे, अतुल सरतापे, प्रा सतिश कुलाळ आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button