अवघ्या 3 तासात हरवलेल्या 7 वर्षीय बालकाचा शोध…. डहाणू पोलिसांची कामगिरी

टाईम्स 9 न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
पालघर जिल्ह्यातील डहाणू लोणी पाडा येथील हरवलेला 7 वर्षीय बालक आदर्श विनोदकुमार सिसोदिया याला डहाणू पोलिसांनी अवघ्या 3 तासात अथक प्रयत्न करून शोधून त्याला त्याच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केले आहे.
डहाणू पोलीस ठाणे हद्दीतील लोणी पाडा येथील 7 वर्षीय बालक आदर्श सिसोदिया गुरुवार दिनांक 12 जून 2025 रोजी हरवला होता. या बालकाचा शोध घेण्यासाठी डहाणू पोलिसांनी डहाणू पोलीस ठाण्याच्या हद्दीत व परिसरात वेगवेगळी शोध पोलीस पथके नेमून तसेच विविध सोशल मीडिया ग्रुप वर माहिती पाठवून शोध घेत असताना डहाणू पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाली की आदर्श विनोद कुमार सिसोदिया हा विरार पोलीस ठाणे हद्दीत मिळून आल्याने तेथील पोलिसांनी सदर बालकास त्याच्या सुरक्षितेसाठी व पुढील शोध कामासाठी मा.अधीक्षक बालकल्याण समिती पालघर यांच्याकडे हजर केले आहे.
व बालकास गिरी वनवासी प्रगती मंडळ मुला मुलींचे बालगृह नरेश वाडी धुंदलवाडी डहाणू येथे सुरक्षित साठी ठेवले आहे.अशी माहिती मिळताच डहाणू पोलिसांनी बालगृहाचे अधीक्षिका वळवी यांच्याशी संपर्क साधून या बालकाला ताब्यात घेऊन सदर बालकाला शुक्रवार दिनांक 13 जून रोजी सुखरूप पणे त्याच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले आहे.
सदर अपहरीत बालकाचा 3 तासात शोध लावण्यात डहाणू पोलिसांना यश आले आहे.सदर यशस्वी शोध मोहीम पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, श्रीमती अंकिता कणसे उपविभागीय पोलीस अधिकारी डहाणू यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. भागिरथी पवार,परि.पोलीस उप अधीक्षक प्रभारी डहाणू व पोलीस उप निरीक्षक पवार या टीमने पार पाडली आहे



