कुर्डवाडी येथे शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर , रेखाताई खेडेकर व प्रा. अर्जुन तनपुरे यांचे स्वागत

उपसंपादक ——हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मो.9730 867 448
कुर्डुवाडी येथे मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर ,माजी आमदार रेखाताई खेडेकर, राज्य कार्याध्यक्ष प्रा. अर्जुन तनपुरे यांचे मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड च्या वतीने शिव स्वागत करण्यात आले . कुर्डुवाडी येथील नव उद्योजक बप्पा कन्हेरे यांच्या पंढरपूर रस्त्यावरील मांगल्य स्टोन डेपो ला भेट देऊन पाहणी केली. त्यांच्या कार्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या व आशिर्वाद दिले.हाॅटेल अण्णा येथे माढा तालुक्यातील सर्व पुरोगामी विचारांच्या संघटना पदाधिकारी यांची ओळख करून घेतली व सर्वांना मार्गदर्शन केले. यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष शिवश्री तात्यासाहेब पाटील, तालुका अध्यक्ष निलेश देशमुख , कार्याध्यक्ष शिवाजी गवळी, सचिव शंकर गवळी, उपाध्यक्ष अरुण जगताप,शहर अध्यक्ष सचिन महिंगडे, संभाजी ब्रिगेड चे राज्य प्रतिनिधि दिनेश जगदाळे , जिल्हा अध्यक्ष सचिन जगताप, सचिव सुहास टोणपे, शंकर वागणे,बबलू पाटील, जिजाऊ ब्रिगेडच्या तालुका अध्यक्ष शिवमती निताताई खटके तसेच मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड तसेच शिवसेना,बामसेफ,RPI, इतर सर्व पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते




