शहर
डासाची कॉईल ठरली काळ : दिल्लीत एकाच कुटुंबातील ६ जण मृतावस्थेत आढळले; दोघे गंभीर

उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448
नवी दिल्लीतील शास्त्री पार्क परिसरात एकाच कुटुंबातील झोपेत मृतावस्थेत आढळले आहेत. त्यांनी घरात रात्रभर डासांपासून बचाव करण्यासाठी डास प्रतिबंधक जळत ठेवले होते.

यामुळे कार्बन मोनोऑक्साइड तयार होऊन गुदमरून त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती उत्तर पूर्व जिल्ह्याचे डीसीपी यांनी दिली आहे. मच्छर प्रतिबंधक जळल्यामुळे लागलेल्या आगीमुळे गुदमरल्याने ही घटना घडली. यात एका चिमुकल्यासह सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोघेजण गंभीर आहेत. पुढील तपास सुरू आहे.